Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

Mohammad Rafi : “आशा भोसले या वयात तरी…”; रफींच्या मुलाचा मंगेशकर बहिणींवर गंभीर आरोप
बॉलिवूडमधील ऑलराऊंडर गायक मोहमम्द रफी यांनी रोमॅंटीक, देशभक्तीपर गीतांसह उडत्या चालीची गाणी देखील गायली… तसेच, संगीत क्षेत्रातील दिग्गज मंगेशकर बहिणींसोबतही त्यांनी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत… पद्मविभूषण आशा भोसले आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत तर रफींची विशेष जोडी जमली होती… मात्र, आता मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी मंगेशकर बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत… लता मंगेशकर व आशा भोसले या दोन्ही बहिणींनी इर्ष्या व असुरक्षिततेतून रफी यांच्या करिअरला धक्का पोहोचवला, असा आरोप शाहिद रफी यांनी केला असून मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्यात व्यावसायिक इर्ष्या होती, या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत…

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत शाहिद रफी यांनी मंगेशकर बहिणींवर आरोप करताना असं म्हटलं आहे की, “मंगेशकर बहिणींनी वडिलांच्या कारकिर्दीला आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता… रफी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स जिंकणार होते, तेव्हाही लता मंगेशकर यांनी हस्तक्षेप केला होता, असा गंभीर आरोप लतादीदींवर देखील केला आहे…

पुढे शाहिद असं देखील म्हणाले की, “रफी साहेब त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत, याचा त्यांना हेवा वाटत होता. त्यांना वाटत होतं की, त्यांच्या पुढे कोणी नसावं. लोकं रफी साहेबांना नंबर वन म्हणत होते आणि त्यांना ते आवडलं नाही. ते नऊ वर्षे घरी निराश बसून होते. १९७० च्या दशकात त्यांनी गायलेलं कोणतंही गाणं तुम्ही ऐका. रफी यांनी नऊ वर्षे न गाण्याचा निर्णय स्वतः घेतला होता, कारण गाणी गाणं हे पाप असल्याचं एका मौलवीने त्यांना म्हटलं होतं. मात्र, काही वर्षांनी रफी पुन्हा इंडस्ट्रीत आले होते”.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
इतकंच नाही तर, रफींच्या गायकीतील चढ-उतारांची रेंज नव्हती, असं आशा भोसले म्हणाल्याचा थेट आरोप शाहिद यांनी केला. ते म्हणाले की, “हे मी त्यांच्या तोंडावरही बोलू शकतो. मी लताजींना त्यांच्या निधनाआधीच हे म्हटलं होतं. लताजींनी दावा केला होता की, माझ्या वडिलांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याने त्यांनी लताजींना म्हटलं की माफ करावं. पण त्यांनी असं कधीच म्हटलं नाही. दोन जण माझ्या वडिलांकडे आले होते आणि लताजींना माफ करा असं म्हणाले होते. नव्या गायिका इंडस्ट्रीत येत होत्या, ज्यात लताजींची बहिणही होती. आणि करिअरबद्दल त्यांना असुरक्षित वाटत होतं. मला सांगा अशा परिस्थितीत कारकीर्दीला उतरती कळा लागण्याचा धोका कोणाला होता?” असा थेट प्रश्न शाहिद रफी यांनी यावेळी उपस्थित केला होता…

६० च्या दशकात मोहम्मद रफी संगीतविश्वात यशाच्या शिखरावर होते, याबद्दल बोलताना शाहिद म्हणाले की, “त्या काळात त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळही नव्हता. माझ्या वडिलांबद्दल कोणीही वाईट बोललेलं, मी कधीच सहन करणार नाही. मी गप्प बसणार नाही, मग ते कोणीही असो. माझे वडील माझे वडील होते,” असं शाहिद यांनी बजावलं. रफींना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून सन्मान मिळणार होता, पण लता मंगेशकर यांनी ‘हस्तक्षेप’ केला होता. शेवटच्या क्षणी लता यांना हा सन्मान मिळाल्यावर वडिलांनी हा विषय सोडून दिला होता”…
====================================
हे देखील वाचा : Asha Bhosle : ४ महिने गरोदर असताना आशा ताईंनी आत्महत्येचा का केला होता प्रयत्न?
====================================
आशा भोसले यांनी रफींच्या आवाजात रेंज नसण्याबद्दल केलेल्या वक्तव्याला शाहिद यांनी थेट उत्तर देताना शाहिद म्हणाले की, “तुम्ही एक सुशिक्षित आहात; या वयात थोडी लाज बाळगा. हे मी त्यांना थेट सांगतोय. परमेश्वर सगळं पाहतोय, माझ्या वडिलांबद्दल कोणी वाईट बोललेलं मला सहन होणार नाही,” असं शाहिद म्हणाले. इतकंच नाही तर “तुमचं वय झालंय, आता स्वतःबद्दल बोला”… आता यावर मंगेशकर कुटुंबाकडून काही प्रत्युत्तर येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi