सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Punha Ekda Saade Maade Teen : कुरळे ब्रदर्सची धमाल परत रंगणार!
अंकुश चौधरी दिग्दर्शित साडे माडे तीन चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही दिसणार आहे. या धमाल चौकडीत रिंकू राजगुरूचाही ताजातवाना अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले, ‘’ या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे .”
====================================
हे देखील वाचा : Harnaaz Kaur Sandhu : ‘बागी ४’ चित्रपटामुळे चर्चेत असणारी ही सुंदरी आहे तरी कोण?
====================================
दरम्यान, झी स्टुडिओज प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया, उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत.
अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi