Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

Rakesh Roshan रोशन यांना ‘K’ अक्षराची एवढी ओढ का?
‘क्रिश’ (Krrish Movie) सारखा सुपरहिरो लहान मुलांना इंट्रोड्युस करणारे दिग्दर्शक-अभिनेते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत… दिग्दर्शक म्हणून पूर्णपणे जबाबदारी सांभाळण्याआधी राकेश यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या आहेत…काही दिवसांपूर्वीच राकेश रोशन यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोडली असून आता ह्रतिक रोशन पहिल्यांदाच दुहेरी भूमिका निभावताना दिसणार आहे… पण तुम्हाला माहित आहे का राकेश रोशन आणि K अक्षराचं एक खास नातं आहे… चला तर मग जाणून घेऊयात…(Bollywood News)

‘घर घर की कहानी’, ‘बुनियाद’, ‘त्रिमुर्ती’, ‘सीमा’, ‘जखमी’, ‘प्रियतमा’, ‘आहुती’, ‘नीयत’, ‘आवाज’, ‘काला बाजार’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं होतं… राकेश रोशन यांनी अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात भरघोस यश मिळवलं… चित्रपट तर त्यांचे हिट होतेच पण सर्व चित्रपटांची नावं ‘के’ किंवा ‘K’ अक्षराने सुरू होत असल्यामुळे ते चर्चेत होते… एकदा झालं असं की, १९८४ मध्ये जेव्हा राकेश त्यांच्या ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटावर काम करत होते, तेव्हा एका चाहत्याने त्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या चाहत्याने त्यांना त्यांच्या चित्रपटांची नावे ‘के’ वरुन ठेवण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी तसं केलं नाही. नंतर १९८६ मध्ये, जेव्हा ‘भगवान दादा’ चित्रपट फ्लॉप झाला, तेव्हा राकेशने चाहत्याच्या त्या पत्रातील बोलण्याचा विचार केला. (Rakesh Roshan Movies)
====================================
हे देखील वाचा : Abhishek Bachchan : ह्रतिक रोशनमुळे आदित्य चोप्राशी ‘धुम २’ वेळी का भांडलेला अभिषेक?
====================================
‘खुदगर्ज’ हा राकेश रोशन यांचा पहिला दिग्दर्शक म्हणून चित्रपट होता. हा चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला… आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता… त्यानंतर मग राकेश यांनी के नावाच्या चित्रपटांचा सपाटाच लावला… पुढे मग राकेश यांनी ‘खट्टा मीठा’, ‘खानदान’, ‘काला बाजार’, ‘करण अर्जुन’, ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘क्रिश ३’, ‘कोयला’, ‘खून भरी मांग’ असे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून बनवले आणि या चित्रपटांना व्यावसायिक यशही मिळालं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi