‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Navya Nair : केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्रीला भरावा लागला लाखो रुपयांचा दंड
कधी कुणाला कुठल्या कारणासाठी दंड भरावा लागेल याचा काही नेम नाही… सध्या ऑस्ट्रेलियातील भारतीयांना आपल्या मायदेशी पर पाठवावे यासाठी तेथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून लोकांनी आंदोलनं देखील करत आहेत… अशात आता मल्याळम अभिनेत्रीला चक्क केसात गजरा माळल्यामुळे ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर लाखोंच्या घरात दंड भरावा लागला आहे… नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात… (Entertainment News)

तर झालं असं की मल्याळम अभिनेत्री नव्या नायर (Navya Nair) हिला नुकताच ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर लाखो रुपयांचा दंड भरावा लागला होता… तिला दंड भरावा लागल्याचं कारण होतं तिने केसांमध्ये फुलांचा गजरा माळला होता. याबद्दल नव्याने स्वतः तिच्या सोशल मीडियावर ही घटना शेअर करत लिहिलं आहे की, ‘सिडनी विमानतळावर पोहोचल्यावर ऑस्ट्रेलियन कस्टम आणि बायोसेक्युरिटी विभागाने मला तपासणीसाठी थांबवले. अधिकाऱ्यांनी माझ्या केसांमधील फुलांच्या गजऱ्याबद्दल विचारपूस केली. गजऱ्यामध्ये नैसर्गिक फुले असल्यामुळे त्यांना देशात आणण्याची परवानगी नाही, असे अधिकाऱ्यांनी मला स्पष्ट सांगितले’.
ऑस्ट्रेलियाचे नियम फार कठोर आहेत. या नियमांनुसार कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वनस्पती किंवा वस्तू देशात आणण्यास सक्त मनाई आहे. संसर्गजन्य रोग किंवा कीटकांचा प्रसार होऊ नये, यासाठी खरं तर ही दक्षता बाळगली जाते… आणि नव्याला या नव्या नियमांबद्दल अजिबात कल्पना नव्हती. या अनपेक्षित चुकीमुळे नव्याला चक्क १.१४ लाखांचा दंड द्यावा लागला होता… नव्या नायरने पोस्टमध्ये असं देखील लिहिले आहे की, ”केसांत गजरा घालून ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याचा प्रयत्न मला एवढा महागात पडेल, अशी मला कल्पनाही नव्हती. या दंडामुळे माझं मोठं आर्थिक नुकसान झालं.”
================================
हे देखील वाचा : Saurabh Gokhale : “डीजेपुढे पारंपारिक वादनाला झुकावं लागलं”
=================================
दरम्यान, नव्याने तिच्या सर्व चाहत्यांना आणि परदेशी प्रवास करणाऱ्यांना आवाहन केले आहे की, ‘परदेशात प्रवास करताना त्या देशाच्या कस्टम आणि इतर नियमांबद्दल आधीच सविस्तर माहिती घ्यावी. अशा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा प्रवासात अनावश्यक अडथळे येऊ शकतात’.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi