सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Bigg Boss 19 मध्ये धक्कादायक घटना, बसीर अलीमुळे टळला मोठा अपघात
सलमान खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 19 (Bigg Boss 19) ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सीझनमध्ये नेहमीप्रमाणे वाद, मतभेद, आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. पण यावेळी केवळ मनोरंजनापुरतेच न राहता एक गंभीर घटना चर्चेचा विषय बनली आहे. घरातील सदस्यांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण घरच धोक्यात आले होते आणि ही चूक उघडकीस आणली ती स्पर्धक बसीर अली (Baseer Ali) याने.(Bigg Boss 19)

लवकरच टेलीकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये पप्रेक्षकांना पहायला मिळेल की, सकाळच्या वेळी घरात तपासणी करताना बसीरच्या लक्षात आलं की, रात्रभर गॅस सुरू ठेवला गेला होता. इतक्या मोठ्या निष्काळजीपणामुळे घरातील सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर संकट ओढवलं असतं. एवढंच नाही, तर शोच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. बसीरने संताप व्यक्त करत इतर सदस्यांना कामं गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला. काही सदस्यांनी आपली चूक मान्य करून माफी मागितली, तर काहींनी हा प्रकार केवळ अतिशयोक्ती असल्याचं सांगत बसीरच्या संतापाकडे दुर्लक्ष केलं. परिणामी घरात मोठा वाद पेटला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि प्रकरण वैयक्तिक पातळीवर पोहोचलं.

ही घटना स्पष्ट करते की बिग बॉसचं घर फक्त मनोरंजनासाठी नाही, तर तिथे शिस्त, जबाबदारी आणि सुरक्षितता किती महत्त्वाची आहे हेही तितकंच अधोरेखित होतं. बसीर अलीने दाखवलेली सजगता आणि जबाबदारीमुळे एक मोठा अपघात टळला असं म्हणायला हरकत नाही. जर वेळेत हे लक्षात आलं नसतं तर, घरात आग लागण्याचा धोका निर्माण होऊन सदस्यांचे जीवही धोक्यात आले असते.(Bigg Boss 19)
===============================
हे देखील वाचा: ‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो?
===============================
दरम्यान, शोमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून शहनाज गिलचा भाऊ शहबाज घरात दाखल झाल्याने वातावरण आणखी रंगतदार होणार आहे. या एन्ट्रीमुळे नवीन समीकरणं तयार होतील की आणखी वाद पेटतील, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. शेवटी सांगायचं झालं तर, बिग बॉस 19 केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता आता सुरक्षितता आणि जबाबदारीच्या मुद्द्यांवरही लक्ष वेधतो आहे. जसजसा सीझन पुढे सरकत आहे, तसतसे प्रेक्षकांना केवळ ड्रामा आणि वाद नाही, तर भावनिक पातळीवरही नवनवीन ट्विस्ट्स अनुभवायला मिळणार आहेत.