सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Shah Rukh Khan याने दिली होती IIT ची परीक्षा?
बॉलिवूडच्या किंग खानला ३० वर्ष इंडस्ट्रीत का केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे… त्यामुळे त्याचे चाहते विशेष आनंदात आहेतच… तसेच, लवकरच शाहरुख लेक सुहाना खान सोबत किंग चित्रपटात दिसणार आहे… अशातच आता त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे… शाहरुख खानने (Shah Rukh Khan) IIT परिक्षा दिली होती असं त्याने या मुलाखतीत कबूल केलं आहे… नेमकं काय म्हणाला आहे शाहरुख जाणून घेऊयात…

शाहरुख खान याने २००० साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “जेव्हा मी करिअर काय करायचं याचा विचार करत होतो तेव्हा माझी आई म्हणाली होती की, तू सायन्स घे. पण मला कॉमर्स घ्यायचं होतं. आईने मला आयआयटीची परीक्षा द्यायला सांगितली. तिने मला ‘तू इंजिनिअरिंगची परीक्षा देऊ शकतो का असं विचारलं. मी म्हणालो,’देतो’. ती म्हणाली, ‘ठीक आहे मला फक्त करु दाखव’. मी परीक्षा दिली आणि पास झालो. मग ती म्हणाली, ‘आता तू अर्थशास्त्राचं शिक्षण घेऊ करु शकतोस”. (Entertainment News)
याच मुलाखतीत शाहरुख परत म्हणाला होता की, “आमचं कुटुंब उदारमतवादी होतं. आपल्या मर्जीने धर्माचं पालन करायला आम्हाला प्रोत्साहन दिलं गेलं… मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला कधीच ठराविक गोष्टी करायला हव्या असं सांगितलं गेलं नाही…”(Bollywood News)
================================
हे देखील वाचा : पहिल्यांदाच दिसली ‘किंग’ची झलक, Shah Rukh Khanचा लूक पाहून चाहते झाले थक्क!
=================================
‘किंग’ चित्रपटाचं शूट काही महिन्यांपासून सुरु आहे… काही दिवसांपूर्वी याच चित्रपटाच्या शूटवेळी शाहरुखला दुखापत झाली होती…मात्र, असं असूनही हाताला पट्टी बांधून शाहरुख मुलगा आर्यन खान याच्या सीरिजच्या ट्रेलर लाँचला हजर राहिला होता… तर, सध्या व्हायरल झालेल्या फोटोवरुन असं सांगितलं जात आहे की, या चित्रपटाचं पोलंडमधील वारसॉ येथे शूट सुरु आहे… व्हायरल झालेल्या ‘किंग’च्या या फोटोत शाहरुखचा खूँखार लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Shah Rukh Khan movies)