Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Marathi Movies 2025 : ३ मराठी चित्रपट येणार आमने-सामने!
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक भाषेतील मेकर्स चित्रपट तयार करत असतातच… अशातच कायम मराठी चित्रपटांची आशय, बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि इतर बऱ्याच बाबतीत हिंदी चित्रपटांशी कायम तुलना केली जाते… मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी चित्रपटाचं नशीब पुन्हा एकदा पालटलं असून प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सकडे पावलं वळवली आहेत… २०२५ चा हिंदी चित्रपटांची आकडेवारी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिला तर ‘छावा’ (Chhaava), ‘सैय्यारा’ (Saiyaara0 , या चित्रपटांव्यतिरिक्त इतर रिलीज झालेल्या सुपरस्टार्स अभिनेत्यांच्या चित्रपटांना हवा तसा रिसपॉन्स प्रेक्षकांकडून मिळाला नाही आहे.. याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘वॉर २’, ‘सन ऑफ सरदार २’, ‘परम सुंदरी’ आणि ‘बागी ४’… मात्र, या उलट मराठी चित्रपटांची जोरदार बॅटिंग सुरु आहे.. एकामागून एक वेगवगेळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असल्यामुळे प्रेक्षकांनाही विविध आशय पाहता येत आहेत… चला तर मग जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी रिलीज होणाऱ्या ३ चित्रपटांबद्दल आणि त्यांना हिंदीचे कोणते चित्रपट टक्कर देणार आहेत…(Marathi movies 2025)

तर, १२ सप्टेंबर २०२५ रोजी चक्क ३ मराठी चित्रपट आमने-सामने येणार आहेत… तीन वेगवेगळ्या Genere च्या चित्रपटांना आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार आहेत हे येणारा काळच ठरवेल… यातला पहिला चित्रपट म्हणजे ‘दशावतार’ (Dashavatar)… ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘दशावतार’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे… या चित्रपटाचं कथानक कोकणातील पारंपारिक नृत्य प्रकार दशावतार कसा असतो हे प्रेक्षकांसमोर मांडताना एक रहस्यमय कथा देखील सांगितली जाणार आहे.. या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वाडगबाळकर, लोकेश मित्तल अशी कलाकारांची फौज असून चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे…

पुढचा चित्रपट आहे ‘आरपार’ (AarPaar)… ह्रता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असणारा हा रोमॅंटिक चित्रपटही १२ सप्टेंबरलाच रिलीज होणार आहे… रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटात ललित व ऋता यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. आणि तिसरा चित्रपट आहे ‘बिन लग्नाची गोष्ट’… या चित्रपटातून प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) १० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र मराठी चित्रपटात दिसणार आहेत… तसेच, गिरीश ओक आणि निवेदिता सराफ हे देखील मालिकेनंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत… त्यामुळे बऱ्याच काळानंतर एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट एकमेकांना टक्कर देणार असून बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही या चित्रपटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी कोणते?
=================================
दरम्यान, १२ सप्टेंबर २०२५ रोजी कुठलाच हिंदी चित्रपट रिलीज होणार नसल्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत मराठी चित्रपटांचं राज्य असणार आहे… त्यानंतर १९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट रिलीज होणार असून यात सिद्धार्थ जाधव, डॉ. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, , प्रीतम कागणे, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा केरकर, अमोल कागणे अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. Aatli Baatmi Futali हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून त्यात विनोद, सस्पेन्स, ड्रामा असे अनेक कंगोरे पाहायला मिळणार आहेत… पत्नीला मारण्याची सुपारी देणारे आजोबा आणि त्यांच्या या प्लॅनमध्ये स्वत:च सहभागी झालेली त्यांची पत्नी असा जांगडगुत्ता या चित्रपटात आहे… तर, याच दिवशी अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) हा चित्रपट रिलीज होणार आहे… या चित्रपटाच्या आधीच्या दोन भागांनी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला होता.. त्यामुळे १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या या दोन चित्रपटांमध्ये स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे…(Bollywood movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi