Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत दिली गोड बातमी !
मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे सध्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास टप्प्यातून जात आहे. 8 सप्टेंबर रोजी आकाशने आपला वाढदिवस साजरा केला आणि त्याच दिवशी त्याने आपल्या चाहत्यांसोबत एक खूपच आनंदाची बातमी शेअर केली. आकाश आणि त्याची पत्नी, अभिनेत्री रुचिका धुरी लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. या खास क्षणाची माहिती रुचिकाने इन्स्टाग्रामवर एका सुंदर पोस्टमधून दिली. तिने लिहिले, “आम्हाला जपून ठेवावं लागलेलं हे सर्वात कठीण गुपित होतं.” या पोस्टसोबत तिने प्रेग्नन्सी टेस्टचा फोटो शेअर केला. आकाशने देखील हीच पोस्ट आपल्या प्रोफाइलवर टाकत लिहिलं, “आम्ही प्रेग्नंट आहोत, देवाचे आभार.” या आनंददायी बातमीसोबत त्यांनी #babyarriving #happiness #love #newmember असे हॅशटॅग वापरले.(Actor Akash Nalawade)

8 सप्टेंबर हा आकाशसाठी द्विगुणित आनंदाचा दिवस ठरला. एका बाजूला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला या गोड बातमीमुळे चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने त्याच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आकाश आणि रुचिकाच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास, या जोडीने 2022 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर 18 मार्च 2023 रोजी त्यांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यात मराठी मालिका विश्वातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. आता लग्नानंतर दीड वर्षांनी या दांपत्याने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देत आनंदाने भरलेला नवा टप्पा सुरू केला आहे.(Actor Akash Nalawade)
=============================
=============================
आकाश नलावडे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साधी माणसं’ या मालिकेत ‘सत्या’ हे पात्र साकारत आहे. हे पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे. याआधीही तो ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत ‘पश्या’ या भूमिकेत झळकला होता आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. त्याची पत्नी रुचिका धुरी देखील मालिकाविश्वातील परिचित चेहरा आहे. या दोघांच्या जोडीने आपल्या आयुष्यातील या गोड क्षणाची माहिती चाहत्यांसोबत शेअर करताच, शुभेच्छांचा ओघ सुरू झाला आहे. आता सर्वांचे लक्ष या नव्या पाहुण्याच्या आगमनाकडे लागले आहे.