Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च !
मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांना एकत्र आणणारा ‘आतली बातमी फुटली’ हा नवा सिनेमा येत्या १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात दिग्गज कलाकारांची उपस्थिती, संगीत टीमचे अनुभव आणि रंगतदार परफॉर्मन्समुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला. हा सिनेमा एका खूनाच्या सुपारीभोवती फिरणारी कॉमेडी क्राइम स्टोरी प्रेक्षकांसमोर आणतो. खूनाची सुपारी कोणत्या दिशेने वळते? या प्रवासात कोणते नातेसंबंध जुळतात आणि त्यातून कोणती धमाल परिस्थिती निर्माण होते? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थेट पडद्यावर अनुभव घ्यावा लागणार आहे. नातेसंबंधांवर भाष्य करतानाच हा चित्रपट प्रेमाचे वेगवेगळे रंगही दाखवतो. जीवनात प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते; ती कधी पटते तर कधी पटत नाही. या वास्तवावरही सिनेमात हलक्या-फुलक्या अंदाजात प्रकाश टाकला आहे.(Aatali Batami Phutli Trailer)

या चित्रपटाची खासियत म्हणजे पहिल्यांदाच एकत्र झळकणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर यांसारखे कलाकारही आहेत. या दमदार कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना हसवून हसवून लोटपोट करेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.

दिग्दर्शक विशाल पी. गांधी सांगतात, “माझा जन्म मुंबईत झाल्यामुळे मला मराठी कलाकार आणि मराठी सिनेमाच्या विषयांबद्दल नेहमीच आकर्षण होतं. ‘आतली बातमी फुटली’मधून मी प्रेक्षकांना दर्जेदार आणि तितकाच मनोरंजक आशय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिच्युएशनल कॉमेडीपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल.” सिनेमाच्या संगीतात ताजेपणा आहे. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, ‘जालीम सरकार’ आणि टायटल ट्रॅक ‘आतली बातमी फुटली’ अशी चार गाणी सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय झाली आहेत. या गाण्यांना जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज सोनाली सोनावणे आणि एग्नेल रोमन यांनी स्वर दिले आहेत. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली आहे.(Aatali Batami Phutli Trailer)
============================
============================
कॉमेडी, थरार आणि संगीताची रंगतदार मेजवानी देणारा ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल. १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाची आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.