Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘जॉली ए.एल.बी ३’ चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती… काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज करुन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या या चित्रपटाचा आता ट्रेलर रिलीज झाला आहे…’जॉली एल.एल.बी’च्या तिसऱ्या भागात दोन्ही वकिल जॉली एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत… ‘जॉली एल.एल.बी ३’ मध्ये प्रेक्षकांना हसवत शेतकऱ्यांची भावुक कहाणी देखील सांगितली जाणार आहे… (Jolly LLB movie)

तर, बहुप्रतिक्षित ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, एक शेतकरी बाप मुलाच्या फोटोफ्रेमसमोर रडत असतो. अशातच एक म्हातारी आजी एका पुतळ्याला मिठी मारुन रडताना दिसते. पुढेअक्षय कुमार आणि अर्शद वारसी अर्थात दोन्ही जॉली आपापल्या संसारात आणि कामात व्यस्त असतात. परंतु दोघांचं नाव एकच असल्याने लोकांचा गोंधळ होतो. त्यामुळे दोघं एकमेकांशी भांडताना दिसतात. नंतर कोर्टात न्यायाधीश असणाऱ्या सौरभ शुक्ला यांची एन्ट्री होते… कोर्टात दोन्ही जॉली एकमेकांशी भांडत असल्याने त्यांना शांत करण्यात न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या नाकीनऊ येतात…(Akshay Kumar Movies)
================================
हे देखील वाचा : पहिल्यांदाच दिसली ‘किंग’ची झलक, Shah Rukh Khanचा लूक पाहून चाहते झाले थक्क!
=================================
पुढे ट्रेलरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या खलनायकाची एन्ट्री होते… मंत्र्याच्या भूमिकेत गजराज राव असून त्यांनी उत्कृष्ट भूमिक साकारली आहे… कथानकात असं दाखवलं आहे की, गजराज राव दिवसाला ५० हजार रुपये देईल, असं आमिष दाखवत अक्षय कुमारला त्याचा वकील म्हणून नेमतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने कोर्टात लढण्यासाठी अर्शद वारसी उभा राहतो. आता २ जॉली एकमेकांसमोर आल्यानंतर काय होणार? कोणता जॉली जिंकणार? याचं उत्तर प्रेक्षकांना १९ सप्टेंबर २०२५ रोजी मिळणार आहे… दरम्यान, ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला, गजराज राव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.(Arshad Warsi movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi