Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य !

 MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य !
टीव्ही वाले मिक्स मसाला

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य !

by Team KalakrutiMedia 10/09/2025

सोनी मराठी वाहिनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवीन प्रयोग करत आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने मागील सात वर्षांत प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं. दर्जेदार विनोद, रंगतदार स्किट्स आणि उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयामुळे या कार्यक्रमाने लोकांच्या घराघरात जागा मिळवली. पण आता या विनोदी प्रवासाला एक नवा आयाम मिळणार आहे. पहिल्यांदाच सोनी मराठी प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येत आहे  ‘MHJ Unplugged’ पॉडकास्ट सिरीज! या नव्या सिरीजमधून प्रेक्षकांना फक्त रंगमंचावरचे प्रहसन नव्हे, तर हास्यवीरांच्या आयुष्यातील खरी कहाणी ऐकायला मिळणार आहे. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्राजक्ता माळी, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रभाकर मोरे यांसारखे लोकप्रिय कलाकार या पॉडकास्टमध्ये त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, वैयक्तिक किस्से आणि प्रवासातील संघर्षांबद्दल मनमोकळं बोलणार आहेत.(MHJ Unplugged)

MHJ Unplugged

या पॉडकास्टचं सूत्रसंचालन सोनी मराठीचे सिनिअर व्हाईस प्रेसिडंट अमित फाळके करणार आहेत. प्रेक्षकांना आवडणाऱ्या स्किट्सच्या मागची मेहनत, त्यांची तयारी आणि कलाकारांच्या जडणघडणीतील प्रेरणादायी गोष्टी उलगडण्याची संधी यातून मिळणार आहे. केवळ रंगभूमीवरील अभिनयच नाही, तर कलाकारांच्या घरगुती आयुष्याशी जोडलेल्या आठवणी, त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट्स आणि आजवर न ऐकलेल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या कानावर येतील.

MHJ Unplugged

‘MHJ Unplugged’ ही पॉडकास्ट सिरीज प्रेक्षकांना हास्यवीरांशी अधिक जवळीक निर्माण करून देणार आहे. त्यांचं विनोदापलीकडचं आयुष्य जाणून घेणं, त्यांची नवी ओळख शोधणं ही या कार्यक्रमाची खरी मजा असेल. प्रत्येक गुरुवारी एक नवा भाग प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना हास्यजत्रेच्या टीमबरोबर वेगळ्या रूपात संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.११ सप्टेंबरपासून ही पॉडकास्ट सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म्सवर हे भाग पाहता आणि ऐकता येतील. तसेच काही खास निवडक क्षण सोनी मराठी वाहिनीवरही दाखवले जाणार आहेत.(MHJ Unplugged)

=================================

हे देखील वाचा: Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण… 

=================================

सोनी मराठीच्या प्रवक्त्यांच्या मते, “महाराष्ट्राची हास्यजत्रेचा आनंद आता एका नव्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. ‘MHJ Unplugged’मुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातली नाती अधिक घट्ट होतील. हा उपक्रम प्रेक्षकांना निश्चितच आवडेल.” तर ११ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘MHJ Unplugged’ पॉडकास्ट सिरीजमधून हास्यजत्रेच्या कलाकारांना एका वेगळ्या रूपात भेटायला विसरू नका!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amit fhalake Celebrity dattu more Entertainment maharashtrachi hasyajatra maharashtrachi hasyajatra poscast maharashtrachi hasyajatra team MHJ Unplugged namrata sabherao prasad khandekar sameer chughule Sony marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.