
Big Boss 19: सलमान खानशिवाय होणार वीकेंड का वार; ‘हा’ अभिनेता करणार सूत्रसंचालन
सलमान खानचा ‘बिग बॉस 19’ सध्या चाहत्यांच्या चर्चेत आहे. घरात रोज नवा वाद, नव्या जोड्या आणि अनपेक्षित ट्विस्ट यामुळे प्रेक्षक खिळून बसतात. विशेषतः वीकेंड का वार ही वेळ म्हणजेच शोचा सर्वात मोठा आकर्षण! पण या आठवड्यात मात्र प्रेक्षकांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. हो, या वीकेंडला सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसणार नाही. भाईजान सध्या आपल्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटासाठी लडाखला रवाना झाला असून, तिथे पुढील काही दिवस शुटिंग सुरू राहणार आहे. त्यामुळे सलमानचा दबदबा असलेला ‘वीकेंड का वार’ या वेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.(Big Boss 19)

मग शो होस्ट कोण करणार? तर या आठवड्यात 13 आणि 14 सप्टेंबरच्या वीकेंड का वार भागात अक्षय कुमार आणि अरशद वारसी प्रेक्षकांसमोर सूत्रसंचालक म्हणून हजेरी लावणार आहेत. स्पर्धकांना ही मोठी सरप्राईज ट्रीट असणार आहे. अरशद वारसीने यापूर्वी पहिल्या सीझनमध्ये बिग बॉस होस्ट केला होता. आता जवळपास 18 वर्षांनी तो पुन्हा या स्टेजवर परत येतो आहे. यासोबतच सलमान खान आणि अरशद वारसी आपल्या ‘जॉली एलएलबी 3’ या आगामी चित्रपटाचं प्रमोशनही या शोमधून करणार आहेत. 19 सप्टेंबरला हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच रिलीज झालेला ट्रेलर चाहत्यांमध्ये जबरदस्त चर्चा निर्माण करतो आहे.

दरम्यान, सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या अॅक्शनपटाची देखील मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंहचीही दमदार भूमिका असणार असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या शेड्युलमध्येच सलमानने अनेक थरारक सीन पूर्ण केले असल्याचं समोर आलं आहे.(Big Boss 19)
============================
============================
सलमान खान आणि बिग बॉस यांची जोडी गेल्या कित्येक सीझनपासून सुपरहिट ठरली आहे. भाईजानच्या हटके स्टाईलमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना प्रेक्षकांना नेहमीच मजा येते. त्यामुळे सलमानशिवायचा वीकेंड का वार प्रेक्षक कसा स्वीकारतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.