Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न

The Bengal Files चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एकतर त्यांच्या काही विधानांमुळे किंवा चित्रपटांच्या विषयावरुन कायम चर्चेत असतात… सध्या ‘द बंगाल फाईल्स’ (The हा त्यांचा चित्रपट जरी चर्चेचा विषय असला तरी प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला दिला नसल्याचं आकडेवारी तरी सांगतेय… खरं तर अग्निहोत्री आणि पल्लवी जोशींच्या आधींच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता… त्यामुळे नेमकी ८ दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घेऊयात…(Entertainment News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘द बंगाल फाईल्स’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी १.१५ कोटी, पाचव्या दिवशी १.३५ कोटी, सहाव्या दिवशी १ कोटी, सातव्या दिवशी अद्याप ९६ लाख आणि आठव्या दिवशी २ लाख कमवत एकूण कमाई ११.२३ कोटी कमावले आहेत. यापूर्वी आलेल्या विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाने २५२.२५ कोटी कमावले होते… तर ‘The Tashkent Files’ ने १६.४१ कोटी, ‘द वॅक्सिन वॉर’ ने १०.३३ कोटी कमावले होते…(The Bengal Files box office collection)
====================================
====================================
‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी (Pallavi Joshi), सिमरत कौर, पालोमी घोष अशी बरीच कलाकार मंडळी आहेत… येत्या काळात किती दिवस हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून राहतो हे नक्कीच पाहायला हवं… दरम्यान, येत्या काळात अनुपम खेर (Anupam Kher) आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत… ‘हम आपके है कोन?’ सारखा आयकॉनिक फॅमेली एन्टरटेनिंग चित्रपट दिल्यानंतर परत ही जोडी एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत… याशिवाय, कॅलरी आणि वायुपुत्र या चित्रपटांमध्येही अनुपम खेर दिसणार आहेत… (Anupam Kher Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi