Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न

Marathi Films : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा गौरव
महाराष्ट्रासह सध्या जगभरातही मराठी चित्रपटांचा डंका वाजत आहे...‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजत असून कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म चा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे…

व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच ‘ऊत’ मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका असून या वर्षाअखेर ‘ऊत’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
====================================
हे देखील वाचा : Dashavatar Movie Review : माणसातला अवतार दाखवणारा ‘दशावतार’
====================================
मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे .चित्रपट प्रदर्शनापूर्वीच विविध महोत्सवांमध्ये दखल घेतलेला ‘ऊत’ मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच वेगळा प्रयत्न ठरेल यात शंका नाही.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi