Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न

Bobby Deol ‘या’ अभिनेत्रीच्या होता प्रेमात; ५ वर्षांचं रिलेशनशिप, लग्नही ठरलेलं पण…
बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांचं सुत एकमेकांशी जुळलं, तर काहीचं रिलेशन किंवा लग्न अर्ध्यावरच मोडली… लिस्ट तशी बरीच मोठी आहे… पण सध्या आपल्या चित्रपटांतील खलनायक भूमिकांमूळे जो अभिनेता गाजतोय त्या बॉबी देओलचं (Bobby Deol) एकेकाळी हिंदीतला टॉपच्या अभिनेत्रीवर प्रेम होतं… ५ वर्ष रिलेशनमध्येही दोघे होते मात्र त्याचं हे पहिलं प्रेम अपुर्णच राहिलं… कोण आहे ती अभिनेक्षी जाणून घेऊयात…(Bollywood couple gossips)

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आणि सध्या बॉलिवूडच नव्हे तर साउथ इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या बॉबी देओलचं (Bobby Deol) करिअर नव्याने उभं राहिलं आहे… एकीकडे त्याचे चित्रपट हिट होत आहेत.. तर दुसरीकडे त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.. बॉबी देओल ९०च्या दशकात अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari) हिच्या प्रेमात होता… जवळपास ५ वर्ष दोघं रिलेशनमध्ये होते… विशेष म्हणजे बॉबी देओल अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच नीलमसोबत रिलेशनशीपमध्ये होता… त्यावेळी नीलम मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नायिका होती… (Entertainment News)

बॉबी देओल आणि नीलम कोठारी आपल्याला नात्याला अजून पुढे घेऊन जात लग्न करणार होते… पण एका व्यक्तीला बॉबीचं हे नातं मान्य नव्हतं… एका रिपोर्टनुसार, बॉबी देओलचे वडील अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना त्या दोघांचं नातं मंजूर नव्हतं, त्यामुळे बॉबी आणि नीलमने त्यांच्या नात्याला पुर्णनिराम देत वडिलांचा विरोध असल्याने परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता… वेगळं झाल्यानंतर एकमेकांच्या नात्याचा आदर ठेवत बॉबी आणि नीलम यांनी सार्वजनिकरित्या कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे दिलं नाही…(Bobby Deol first love)
====================================
हे देखील वाचा : Animal : बॉबी देओल मूक-बधीर का होता? संदीप म्हणाले…
====================================
बॉबी आणि नीलम यांनी कधीच कुठल्याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही… परंतु, वैयक्तिक पातळीवर दोघांनी आपलं करिअर सेट केलं होतं… बॉबी देओलने Animal चित्रपटात उत्कृष्ट खलनायक साकारुन स्वत:च्या करिअरला नवी संजीवनी दिली आहे असंच म्हणावं लागेल… दरम्यान, लवकरच बॉबी देओल ‘वेलकम टु द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi