‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Hemant Dhome च्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये कलाकारांची फौज
दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) याच्या एका चित्रपटाची गेल्या बऱ्याच काळापासून जोरदार चर्चा सुरु आहे… ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा आगामी चित्रपट लवकरच भेटीला येणार असून हा हेमंत ढोमे याचा आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे… ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटानंतर हेमंत ढोमे हा चित्रपट घेऊन येत असून या मराठी चित्रपटातून प्राजक्ता कोळी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे…

‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ चित्रपटाची कथा मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर आधारित आहे… हेमंत ढोमेने आजवर फॅमेली ड्रामा चित्रपटांवर अधिक भर दिला आणि त्याचे प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना भावले देखील… आता ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ चित्रपटातून एक महत्वाचा विषय तो प्रेक्षकांसमोर मांडणार आहे… आजवर ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘बघतोस काय मुजरा कर’ असे बरेच चित्रपट त्याने दिग्दर्शित केले… शिवाय, हेमंतचा अभिनय असणारे देखील प्रत्येक चित्रपट गाजलेच आहेत…

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, “माझे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं आणि आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे त्याचं चित्रीकरण मला याच भागात करता आलं याचा प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला होता आणि आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
================================
=================================
आता ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ चित्रपटात कोणते कलाकार असणार यावरुन पडदा उचलला गेला आहे.. सचिन खेडेकर, अमेय वाघ,सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) अशी भन्नाट कलाकारांची फौज दिसणार आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi