Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

“अखेर माझ्या आयुष्यात ‘ती’ आली; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने चाहत्यांना दिली खास बातमी !
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला आणि आपल्या सटल विनोदशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा निखिल बने सध्या जोरदार चर्चेत आहे. रंगभूमीपासून छोट्या पडद्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी राहिला आहे. यावेळी मात्र निखिल आपल्या स्किट्स किंवा विनोदामुळे नव्हे तर एका खास पोस्टमुळे चर्चेत आला आहे.(Maharashtrachi Hasyajatra)

निखिलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “अखेर माझ्या आयुष्यात ती आली… माझी Dream Bike”. ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. भांडूपच्या चाळीत वाढलेला निखिल ने मेहनतीच्या जोरावर स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने नुकतीच आपली ड्रीम बाईक पिवळ्या रंगाची Triumph Scrambler 400cc विकत घेतली आहे. निखिलच्या या पोस्टवर नेटकरी आणि चाहत्यांकडून “अभिनंदन भावा”, “कडक”, “एक नंबर”, “चलो रोड ट्रिपवर जाऊ या”, अशा प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी “आज खऱ्या अर्थाने दिन बने” असं म्हणत कौतुक केलं.

निखिलच्या आयुष्याचा प्रवास खरतर सोपा नव्हता. कोकणात मूळ असलेल्या निखिलचं बालपण भांडूपच्या साध्या चाळीत गेलं. लहानपणापासूनच कलेची आवड असलेल्या निखिलने ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. याच काळात त्याला अभिनयाचं वेड लागलं. कॉलेजमध्ये विविध एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. केवळ भाग घेण्यापुरतं न थांबता त्याने अनेक पारितोषिकं जिंकली आणि आपली ओळख निर्माण केली. कॉलेजनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने त्याला मोठं व्यासपीठ मिळालं. या कार्यक्रमातल्या स्किट्समुळे तो प्रेक्षकांचा लाडका झाला. आज निखिल फक्त हास्यजत्रेतच नाही, तर विविध मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्येसुद्धा झळकत आहे. स्वतःच्या कलेवरचा विश्वास, सातत्याने केलेली मेहनत आणि प्रेक्षकांचं प्रेम यामुळे त्याने वेगळं स्थान मिळवलं आहे.(Maharashtrachi Hasyajatra)
============================
============================
ड्रीम बाईकचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता निखिलचं पुढचं लक्ष्य स्वतःचं घर घेण्याचं आहे. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वप्नं कशी पूर्ण करता येतात याचं उदाहरण निखिल बनेनं दिलं आहे. आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.