
Dashavatar ची हॅट्रिक; १० कोटींचा टप्पा पार करत प्रेक्षक ठरले मराठी चित्रपटांचे ‘राखणदार’!
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही… प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मराठी चित्रपटांना मिळत आहेच शिवाय बॉक्स ऑफिसवर चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहेत… नुकतेच एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट रिलीज झाले होते आणि प्रत्येक चित्रपटाने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे… विशेषत: दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावालं आहे… दशावतारमधील प्रभावळकरांच्या कामाने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे की Age is just a number. ‘दशावतार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून १० कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे… (Dashavatar movie)

बऱ्याच महिन्यांनंतर मराठी चित्रपटाने १० कोटींचा टप्पा पार केला आहे… कोकणातील दशावतार या लोककलेवर चित्रपटाचं कथानक आधारित असून रहस्यमय कथानक यात गुंफण्यात आलं आहे… सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.८० कोटी कमावले असून यय़स्वीपणे दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने प्रवेश केला आहे…(Dashavatar box office collection)

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत बरेच मराठी चित्रपट रिलीज झाले… त्यांचा सामना हिंदी, साऊथ चित्रपटांशी झाला होता; असं असूनही मराठी चित्रपटांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं… सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत मराठी चित्रपटांनी देशभरात ५१.४५ कोटी आणि जगभरात ५२.७ कोटी कमावले आहेत…(Marathi movie box office collection 2025)
================================
हे देखील वाचा : Baaghi 4 : टायगर श्रॉफचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ही फ्लॉप?
=================================
तसेच, इतर मराठी चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर ‘जारण’ ७.३८ कोटी, ‘आता थांबायचं नाय’ ६.६९ कोटी, ‘गुलकंद’ ७.३२ कोटी, ‘फसक्लास दाभाडे’ ३.६४ कोटी अशी मराठी चित्रपटांनी कमाई केली आहे… आता येत्या काळात प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसादामुळे मराठी चित्रपट पुन्हा एकदा १०० कोटींपर्यंत पोहोचतील हिच अपेक्षा आहे…(Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi