‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Zee Marathi ची लोकप्रिय मालिका संपणार? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने चर्चांना उधाण…
‘शिवा’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेने ऑगस्ट 2025 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता असंच काहीसं आणखी एका मालिकेबाबत घडताना दिसत आहे. झी मराठीवरीलच ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका देखील बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्रीच्या भावनिक पोस्टनंतर ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे. ही मालिका गेल्या वर्षी सुरू झाली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. ‘सूर्या दादा’ आणि ‘तुळजा’ ही जोडी विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. नितीश चव्हाण आणि मृण्मयी गोंधळेकर या कलाकारांनी साकारलेली ही जोडी छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली.(Lakhat Ek Amcha Dada Serial)

या मालिकेत सूर्या दादाची धाकटी बहीण ‘राजश्री’ ही भूमिका अभिनेत्री ईशा संजय हिने साकारली होती. खमकी, जिद्दी, पण कुटुंबासाठी प्रचंड आपुलकी असलेली राजश्री प्रेक्षकांची लाडकी बनली होती. नुकतंच ईशाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे ही मालिका संपणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

या व्हिडिओमध्ये ती सेटवरील मेकअप रुममध्ये मेकअप करताना दिसते. या पोस्टला तिने कॅप्शन दिलं आहे की, “राजश्री म्हणून शेवटचं एकदा तयार होताना… मन खूप भरून आलंय, खूप साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून जात आहेत. डोळ्यात पाणी आलंय, हात थंड पडलेत… 1 वर्ष आणि 5 महिने… राजू या भूमिकेतून निरोप घेते.” ईशाच्या या भावनिक पोस्टनंतर अनेक सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यातून मालिका पूर्णपणे संपते आहे का, की केवळ ईशाने मालिका सोडली आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. झी मराठीकडून किंवा इतर कलाकारांकडून यासंदर्भात कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.(Shiva Marathi Serial)
=============================
हे देखील वाचा: ‘काजळमाया’ या गूढ मालिकेतून अक्षय केळकरची स्टार प्रवाहवर एण्ट्री!
=============================
या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरतेय. झी मराठीच्या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेला एकही नामांकन मिळालं नाही. त्यामुळे ही मालिका संपते आहे की काय, असा अंदाज अनेक प्रेक्षक लावू लागले आहेत. आता या चर्चांना पूर्णविराम कधी मिळतो आणि वाहिनीकडून काय घोषणा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.