‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Kareena Kapoor बॉलिवूडची अशी अभिनेत्री जी स्वत:चेच चित्रपट पाहात नाही….
बॉलिवूडची एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळख असणारी बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस… २५ वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने गाजवणारी करिना कायम विविधांगी भूमिका साकारत असते… २००० च्या सुरुवातीला प्रत्येक सामान्य मुलगी रिलेट करु शकेल अशी पात्र तिने चित्रपटात साकारली… २००० मध्ये ‘रेफ्युजी’ (Refugee movie) चित्रपटापासून सुरु झालेला तिचा चित्रपटांचा प्रवास आजही अविरतपणे सुरु आहे… पण तुम्हाला माहित आहे का बेबो तिचे चित्रपट रिलीज झाल्यानंतर पाहातच नाही… काय आहे त्यामागचं कारण? जाणून घेऊयात…

करीना कपूरने फार आधी एका मुलाखतीत ती स्वत:चे चित्रपट का पाहात नाही? याबद्दल खुलासा करताना म्हणाली होती की, तिला पडद्यावर स्वतःला पाहणे आवडत नाही… आणि याच कारणामुळे ती तिचे चित्रपट बहिण करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि आई बबिता यांना दाखवते आणि त्यांच्याकडून फिडबॅक घेते… लोकांनी त्यांची मतं दिल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी करिना तिचे चित्रपट पाहते… ज्यामुळे ती आरामात तिच्या अभिनयाचा आणि चित्रपटाचा आनंद घेऊ शकते…(Bollywood Bebo girl)
================================
हे देखील वाचा : Kareena Kapoor : करिना नाही तर ‘जब वी मेट’मधील गीत असती ‘ही’ अभिनेत्री
================================
मोठ्या पडद्यावर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकल्यानंतर पुन्हा करिना चित्रपटात अजूनतरी दिसली नाही… शिवाय, नेटफ्लिक्सच्या जाने जा चित्रपटातून तिने ओटीटीवर पदार्पण करत एक नवी इनिंग सुरु केलीच… आता येत्या काळात करिनाचे आणखी विविध चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच तिचे चाहते उत्सुक असणार… मात्र, आजही प्रेक्षकांना करिनाने साकारलेली गीत विशेष आवडते यात तिळमात्र शंका नाही… (Bollywood news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi