Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

… तर Aishwerya Rai दिसली असती ‘मंगल पांडे : द रायजिंग’ चित्रपटात!
बायोपिक्स, प्रेमकथा, हॉरर, हॉरर-कॉमेडी अशा वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट मराठीसह हिंदी, साऊथमध्येही सातत्याने येत असतातच… परंतु, ऐतिहासिक चित्रपट करणं ही फार मोठी जबाबदारी आणि जोखमीचं काम असतं असं नक्कीच म्हणावं लागेल… आजवर मराठीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वावर आधारित चित्रपट आले खरे पण काही जरा आपटलेच… नुकताच बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ हा चित्रपट केला जो सुपरहिट ठरला… या आधी साधारण २० वर्षांपूर्वी आमिर खान (Aamir Khan) याचा ‘मंगल पांडे : द रायजिंग’ हा ऐतिहासिक चित्रपट आला होता… यात जरी आमिर लीड रोलमध्ये दिसला असला तरी आधी चित्रपटाचं कास्टिंग वेगळंच होतं… शिवाय चित्रपटातून ऐश्वर्या रायचा (Aishwerya Rai) पत्ता कट केला गेला होता… काय होता किस्सा जाणून घेऊयात याबद्दल… (Mangal Pandey : The Rising)

तर, १८५७ च्या लढ्यावर ‘मंगल पांडे : द रायजिंग’ हा चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता यांनी साकारला होता… सुरुवातीला मंगल पांडेच्या भूमिकेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसणार होते; पण त्याच काळात बच्चन यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यामुळे हा चित्रपट होऊ शकला नाही…. नंतर १९९४ मध्ये याच विषयाला घेऊन ‘किस्सा कारतुस का’ हा चित्रपट तयार करणार होते आणि यात संजय दत्त मंगल पांडेची भूमिका करणार होता… पण त्यावेळी संजय दत्त (Sanjay Dutt) एका वेगळ्याच मोठ्या अडचणीत सापडल्यामुळे पुन्हा चित्रपट बारगळला… आणि मग मेहता यांनी अखेर ‘मंगल पांडे : द रायजिंग’ या नावाने चित्रपट करायचा ठरवला… तेव्हा चित्रपटाची नायिका असणार होती ऐश्वर्या राय पण चक्क तिचा पत्ता कट केला गेला… (Bollywood Movies)

तर झालं असं की, आमिर खान मंगल पांडेची भूमिका करणार हे फिक्स झालं होतं… आणि ज्वालाच्या भूमिकेत असणार होती ऐश्वर्या राय… पण चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये आणि ऐश्वर्याच्या टीममध्ये काही गैरसमज झाले आणि मंगल पांडे चित्रपटातून ऐश्वर्याची एक्झिट झाली… त्यानंतर दिग्दर्शकाने राणी मुखर्जीचा (Rani Mukherjee) विचार करुयात असं सुचवलं… पण राणीला चित्रपटातली ज्वालाची नाही तर हिराची भूमिका हवी होती… सरतेशेवटी राणी मुखर्जीने ‘मंगल पांडे : द रायजिंग’ चित्रपटात हिराची आणि आमिषा पटेलने ज्वालाची भूमिका साकारली आणि आमिर खानने अगदी अलगद ऐश्वर्याचा पत्ता चित्रपटातून कट केला…(Rani Mukherjee Movie)
================================
हे देखील वाचा : ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे कनेक्शन?
================================

दरम्यान, ऐश्वर्या राय आणि आमिर खान यांनी 90’s मध्ये एक कर्मशिअल काम केलं होतं आणि त्यानंतर धर्मेश दर्शन यांच्या ‘मेला’ (Mela movie) चित्रपटात काही सेकंदांसाठी आमिर आणि ऐश्वर्याने स्क्रिन शेअर केली होती… त्यानंतर मुकेश भट्ट यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘मुलाकात’ (Mulaquat) या चित्रपटात १९७७ मध्ये दोघे एकत्र कास्ट झाले असते.. पण काही कारणामुळे ते शक्य झालं नाही आणि आजपर्यंत ऐश्वर्या राय आणि आमिर खान यांनी आजवर एकत्र एकही चित्रपट केला नाही आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi