Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अखेर स्वप्न पुर्ण झालं; प्रियदर्शन यांच्या चित्रपटात अक्षय कुमार आणि Mohanlal दिसणार एकत्र!
दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी साऊथसह बॉलिवूडमध्येही अजरामर चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत… बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपटांचा एक वेगळाच बेंचमार्क प्रियदर्शन यांच्या चित्रपटांनी सेट केला आहे… आजवर प्रियदर्शन यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पद्मश्री मोहनलाल (Mohanlal) यांच्यासोबत चित्रपट केले आहेत… मात्र, पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपटात हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत… प्रियदर्शन यांनी स्वत: त्यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटात अक्षय कुमार आणि मोहनलाल यांच्या महत्वाच्या भूमिका असल्याची कबूली दिली आहे…(Entertainment news)

पिंकव्हिलाशी बोलताना प्रियदर्शन यांनी ‘हैवान’ (Haiwaan movie) चित्रपटाबद्दल बोलताना असं म्हटलं आहे की, “’हैवान’ चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) प्रमुख भूमिकेत असून त्याच्या विरोधात कुठलाही अभिनेता काम करण्यास नकार देत होता… मी अक्षय सोबत ‘भूत बंगला’ (Bhoot Bangala) चित्रपटाचं शुटींग करत असताना मी अक्षयला म्हणालो की मला वाटत नाही की हैवान चित्रपट आला मी करु शकेन… यावर अक्षयने मला अडचण विचारली… मी सांगितलं की मला सैफच्या विरोधात कोणताच अभिनेता होकार देत नाहीये, त्यांना असं वाटतंय की त्यांची भूमिका फार लहान आहे. हे ऐकताच अक्षय मला म्हणाला की तुला काही अडचण नसल्यास मला ती भूमिका करायला आवडेल…”, असं म्हणत प्रियदर्शन म्हणाले की आजवर मोहनलाल आणि अक्षय कुमार यांनी माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे आणि माझ्या प्रत्येक चित्रपटात काम केलं आहे…

पुढे प्रियदर्शन असं म्हणाले की, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात मोहनलाल देखील दिसणार आहेत.. पण आताच मला त्यांची भूमिका काय आहे हे सांगायचं नाही आहे… मला बरीच लोकं म्हणायची की तु कधीच अक्षय कुमार आणि मोहनलाल यांना एकत्र घेऊन चित्रपट करु शकणार नाही… पण हैवान चित्रपटाच्या निमित्ताने अखेर माझी ही इच्छा पुर्ण होत आहे”… या आधी अक्षय कुमार आणि मोहनलाल यांनी ‘कनप्पा’ या तेलुगू चित्रपटात एकत्र काम केलं होतं…
================================
हे देखील वाचा : पद्मश्री Mohanlal यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर!
================================
दरम्यान, ‘हैवान’ या चित्रपटात सैफ अली खान याची प्रमुख भूमिका असून अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे… विशेष म्हणजे ‘टशन’ (Tashan) चित्रपटानंतर तब्बल १८ वर्षांनी अक्षय़ आणि सैफ स्क्रिन शेअर करणार आहेत… आजवर दोघांनी ‘मै खिलाडी तू अनाडी’,’तू चोर मै सिपाही’, ‘दिल्लगी’, ‘आरजू’ अशा काही सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे… आता पुन्हा एकदा ही जोडी काय धमाल उडवणार हे प्रेक्षकांना २०२६ मध्येच समजणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi