‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss Marathi फेम अभिनेत्याच्या बायकोची राजकारणात एन्ट्री; अरुण गवळीशी आहे खास नातं !
सध्या सर्वत्र बीएमसी निवडणुकांचा धडाका सुरू आहे आणि अशातच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीने राजकारणात प्रवेश करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनेत्री नाही, तर त्या अभिनेत्याची पत्नी असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्या उमेदवारी सादर करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या अभिनेत्याबद्दल बोललं जातंय, तो म्हणजे अक्षय वाघमारे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या अक्षयने मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्येही चांगलं काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेला अक्षय, आणि आता त्याच्या पत्नीचं राजकारणातलं पदार्पण, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Actor Akshay Waghmare)

योगिता गवळी ही अरुण गवळी यांची कन्या आणि अक्षय वाघमारे यांची पत्नी यांनी आता थेट राजकीय मैदानात पाऊल टाकलं आहे. योगिता गवळी आगामी बीएमसी निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी तुरुंगातून बाहेर आले होते. त्यांच्या राजकारणात सक्रीय होण्याची चर्चा होती, मात्र सध्या त्यांच्या जागी त्यांच्या दुसऱ्या मुलीने, योगिता गवळीने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बहिणीच्या गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली योगिता या निवडणुकीत उतरतील.

अखिल भारतीय सेनेचे मुंबई महापालिकेत दोन नगरसेवक होते. यातील माजी नगरसेविका वंदना गवळी या आता शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात अखिल भारतीय सेना उमेदवार उभा करणार असल्याचं गीता गवळी यांनी स्पष्ट केलं आहे. योगिता गवळी सध्या महिलांच्या आरोग्याशी संबंधित सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. अक्षय आणि योगिताचं लग्न लॉकडाऊनच्या काळात साध्या पद्धतीने झालं होतं. त्याआधी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. ८ मे २०२० रोजी लग्नसोहळा पार पडला आणि त्यानंतर दोघांना एका मुलीचा आशीर्वादही लाभला आहे.(Actor Akshay Waghmare)
==================================
==================================
अक्षय वाघमारेच्या करिअरकडे पाहिलं तर, तो ‘फत्तेशिकस्त’, ‘बस स्टॉप’, ‘दोस्तीगिरी’, ‘बेधडक‘ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे. याशिवाय ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतही तो दिसला होता. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात तो शोमधून बाहेर पडला होता.