‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Masti 4 चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज; जाणून घ्या रिलीज डेट!
बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल्सची लाट आली आहे… नुकताच ‘हाऊसफुल्ल’ फ्रेंचायझीमधील पाचवा पार्ट अर्थात ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) रिलीज झाला होता… आता पुन्हा एकदा २००४ मध्ये प्रेक्षकांना तीन मित्रांची भन्नाट कथा आणि खळखून हसवणारे विनोद असणारा ‘मस्ती’ चित्रपट रिलीज झाला होता.. आता या चित्रपटाचा चौथा भाग म्हणजेच ‘मस्ती ४’ (Masti 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… प्रेक्षकांना पुन्हा एकदा तीन मित्रांची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे…

अभिनेता रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या प्रमुख भूमिका असणारा मस्ती फ्रेंचायझीतील मस्ती ४ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ३ अभिनेत्यांसोबत श्रेया शर्मा, रुही सिंग आणि एलनाझ नोरोझी या अभिनेत्री दिसणार आहेत.. तसेच, ‘मस्ती ४’ येत्या २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या भागाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार आहेत… आणि ए. झुनझुनवाला, शिखा करण अहलुवालिया, इंद्र कुमार, अशोक ठाकेरिया, शोभा कपूर, एकता कपूर आणि उमेश बन्सल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Entertainment News)
====================================
====================================
दरम्यान, २००४ मध्ये ‘मस्ती’ चित्रपट प्रदर्शित झाला होता… यात अजय देवगण, विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, लारा दत्ता, अमृता राव, तारा शर्मा आणि जिनिलीया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या… यानंतर ‘ग्रँड मस्ती’ (२०१३) आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ (२०१६) मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले… आणि आता ९ वर्षांनी ‘मस्ती’चा चौथा भाग २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा कॉमेडीचा नवा अध्याय नक्कीच पाहायला मिळेल… (Masti movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi