
दिलीप प्रभावळकरांच्या Dashavatar चित्रपटापुढे अक्षयही पडला फिका!
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने बऱ्याच काळानंतर हॅट्रिक केली आहे… प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासाह ‘दशावतार’ ने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे… अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या ‘जॉली एल.एल.बी ३’ चित्रपटालाही टक्कर देत दशावतारने किती कोटींचा गल्ला जमवला आहे जाणून घेऊयात.. (Marathi movie 2025)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ लाख, दुसऱ्या दिवशी १.४ कोटी, तिसऱ्या दिवशी २.४ कोटी, चौथ्या दिवशी १.१ कोटी, पाचव्या दिवशी १.२५ कोटी, सहाव्या दिवशी १.३ कोटी, सातव्या दिवशी १.१५ कोटी, आठव्या दिवशी १ कोटी, नवव्या दिवशी २.६५ कोटी, दहाव्या दिवशी ३ कोटी, अकराव्या दिवशी ८ लाख, बाराव्या दिवशी ८ लाख, तेराव्या दिवशी ६० लाख कमवत एकूण १८.०५ कोटींची कमाई केली आहे…(Dahsvatar box office collection)
================================
================================
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत… १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपटाचंही मार्केट खाऊन टाकलं आहे… मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकही आवर्जून दशावतार पाहायला जात आहेत…