
National Film Awards : सचिन पिळगांवकर ते त्रिशा ठोसर; या मराठी बाकलाकारांनी कोरलं आहे राष्ट्रीय पुरस्कारावर नाव!
भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपल्या नावावर कोरण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते… १९५४ साली पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता आणि आनंदाची बाब म्हणजे यात मराठी चित्रपट श्यामची आईने पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता… आजवर अनेक दिग्गज कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काने सन्मानित करण्यात आलं आहे… तसेच, या सुपरस्टार्सच्या यादीत चिमुकल्या बालकलाकारांनी अगदी कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे.. चला तर जाणून घेऊयात आजवर कोण-कोणत्या बालकलाकारांनी हा पुरस्कार जिंकला आहे…

१९७१ मध्ये ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांना बालकलाकार म्हणून पहिला राष्ट्रीय पुरस्कार अजब तुझे सरकार या चित्रपटासाठी मिळाला होता. त्यानंतर, मृण्मयी चांदोरकर ( १९८९, कळत नकळत चित्रपट), अश्विन चितळे (२००३, श्वास चित्रपट), शरद गोएकर (२००७, टिंग्या चित्रपट), शंतनु रांगणेकर (२०१०, चॅम्पियन्स चित्रपट), मच्छिंद्र गडकर (२०१०, चॅम्पियन्स), विवेक (२०१०, बाबू बॅण्ड बाजा), सोमनाथ अवघडे (२०१३, फॅंण्ड्री), श्रीनिवास पोकळे (२०१८, नाळ), आकांक्षा पिंगळे (२०२०, सुमी), दिवेश इंदुलकर (२०२०, सुमी), अनिश गोसावी (२०२०, टक-टक), कबीर खंदारे (२०२३ जिप्सी),दरम्यान, पहिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता बेबी राणी हिने १९६८ मध्ये. तिलाा ‘गीता’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता…
================================
=================================
येत्या काळात मराठीसह इतर प्रादेशिक भाषेत नवनविन विषयांवर आधारित कलाकृती येत राहाव्यात आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासह त्यांना समाजातील महत्वाच्या गोष्टी देखील समजाव्यात हिच इच्छा… तसेच, भविष्यात आता आणखी कोणते बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार पटकावतात हे पाहणं महत्वाचं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi