Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला मोठा खुलासा!
हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख ज्या एका माणसाच्या नावाने जगभरात केली जाते ते नाव म्हणजे महानायक अमिताभ बच्चन… ५० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बिग बी यांचं खरं नाव काय त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन (Harivanshrai Bachchan) काय ठेवणार होते हे तुम्हाला माहित आहे का? खरं तर इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांची खरी नावं वेगळी आहे आणि स्क्रिनवरील नावं वेगळी आहेत… यात कियारा अडवाणी, अक्षय कुमार अशा बऱ्याच कलाकारांच्या नावाचा उल्लेख करता येईल… आता नुकत्याच एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी त्यांच्या जन्मानंतर त्यांच्यासाठी एका वेगळ्याच नावाची निवड केली होती.. त्याबद्दल त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन (Ajitabh Bachchan) यांनी माहिती दिली आहे. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात…

अजिताभ बच्चन यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा किस्सा सांगताना म्हटलं की, “ आमच्या वडिलांना अमिताभ यांचं नाव इन्कलाब, असं ठेवायचं होतं. कारण त्या काळी ते स्वातंत्र्यासाठी लढत होते. आणि माझं नाव त्यांना आझाद ठेवायचं होतं कारण माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला होता… पण ही नावं न ठेवता आमची नावं अतिमाभ आणि अजिताभ ठेवण्यात आली…” दरम्यान, अजिताभ यांची मुलगी पेंटर असून तिने तिच्या पोर्टेट्सना इन्कलाब आणि आझाद अशी नावं दिली आहेत…
====================================
====================================
दरम्यान, अमिताभ बच्चन हे अधिकृतपणे बच्चन हे आडनाव लावणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.. याआधी जातिव्यवस्थेच्या विरोधात एक प्रतीकात्मक पाऊल म्हणून हरिवंश राय बच्चन यांनी आपलं मुळ आडनाव श्रीवास्तव न वापरता हे आडनाव स्वीकारलं होतं… त्यांची आई त्यांना ‘बच्चनवा’ असं म्हणायच्या.. त्यामुळे पुढे भविष्यात हरिवंशराय यांनी आपल्या लिखाणासाठी बच्चन हे आडनाव वापरायला सुरुवात केली… आणि पुढे अधिकृतपणे अमिताभ यांनी बच्चन हे आडनाव लावण्यास सुरुवात केली…(Entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi