‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’ भूमिका
मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे… मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एकामागून एक सुपरहबिट चित्रपट येताना दिसत आहेतच… परंतु, हिंदीतही आता आपले पाय भक्कमपणे रोवण्यास त्याने सुरुवात केली आहे… मराठीत २ ब्लॉकबस्टर बायोपिक दिल्यानंतर आता सुबोध भावे (Subodh Bhave) हिंदीत नव्या बायोपिकमध्ये दिसणार आहे… महापुरुषांच्या बायोपिक्समध्ये आता संतांच्या जीवनावर आधारित चरित्रपटांमध्येही भर होताना दिसत आहे…

सुबोध भावे याने सोशल मिडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं… या बायोपिकमध्ये सुबोध नीम करोली बाबा यांची भूमिका साकारणार असून याच चित्रपटाचं नाव आहे ‘श्री बाबा नीब करोरी महाराज’... दरम्यान, ही भूमिका साकारायला मिळाल्याबद्दल सुबोधने मेकर्सचे आभार मानले आहेत… या बायोपिकमध्ये बाबांचा वयाच्या ८व्या वर्षापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.. तसेच, वृंदावन, लखनऊ आणि प्रयागराज येथेही चित्रीकरण केले जाईल. दरम्यान, या चित्रपटात सुबोध भावेसह मिलिंद गुणाजी, समीक्षा भटनागर, हितेन तेजवानी असे बरेच हिंदी कलाकारही दिसणार आहेत…दरम्यान, बाबा नीम करोली महाराज (Shree Baba Neeb Karori Maharaj) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय संतांपैकी एक होते…
====================================
हे देखील वाचा : सुबोध भावेने सांगितला पहिल्या विमान प्रवासाचा धमाल किस्सा
====================================
सुबोध भावेच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर २०१२ मध्ये ‘अय्या’ (Aiyyaa) चित्रपटातून सुबोधने हिंदीत आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती… त्यानंतर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकसाकारत त्याने आपलं स्थान निर्माण केलं होतं… शिवाय, मराठीत ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘लोकमान्य टिळक’, ‘संगीत मानापमान’, ‘कट्यार काळजात घुसली’ असे दर्जेदार चित्रपट सुबोधने मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi