
Ranbir Kapoor याने ‘अॅनिमल पार्क’ चित्रपटाबद्दल दिली मोठी अपडेट!
२०२३ मध्ये बॉलिवूडच्या इतिहासातील रक्तरंजित चित्रपट रिलीज झाला होता तो म्हणजे ‘अॅनिमल’ (Animal Movie)… संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका होती… या चित्रपटाने प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळवला होता… पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर लवकरच ‘अॅनिमल पार्क’ हा दुसरा भाग येणार आहे… याच सीक्वेलबद्दल रणबीर कपूरने एक महत्वाची अपडेट दिली आहे… (Ranbir Kapoor movies)

अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियार तुफान व्हायरल झाला आहे… या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. तो म्हणाला की, “संदीप यांनी माझ्यासोबत चित्रपटातील पात्र, संकल्पना आणि संगीत यावर चर्चा केली. हे सगळं यावेळेस अप्रतिम असणार आहे.” (Animal Park movie)
पुढे रणबीर कपूर म्हणाला आहे की, “२०२७ पासून ‘अॅनिमल पार्क’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.” ही बातमी समोर आल्यानंतर, ‘अॅनिमल पार्क’ची वाट पाहणारे चाहते आनंदी झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला असून चाहते फार उत्सुक आहेत… अॅनिमल चित्रपटात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या…
====================================
हे देखील वाचा : Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती
====================================
आता दुसऱ्या भागात रणबीर कपूरसोबत कोणते कलाकार असणारे हे पाहणं महत्वाचं असणार आहे… रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘अॅनिमल पार्क’ व्यतिरिक्त ‘रामायण पार्ट १’, ‘लव्ह अँड वॉर’ आणि ‘ब्रह्मास्त्र पार्ट २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे.(Ranbir Kapoor movies)