Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

७ वेळा नकार मिळूनही Chak De India गाणं तयार झालं तरी कसं?
शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखल मनोरंजन केलं आहे… खलनायक, रोमॅंटिक हिरो अशा निराळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये तो कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी झाला आहे… परिणामी तब्बल ३० वर्षांनी त्याला जवान चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला… शाहरुखच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘चक दे इंडिया’ (Chak De India movie) आणि त्यातील त्याची कबीरची भूमिका… २००७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथा तर अप्रतिम होतीच, शिवाय यातील प्रत्येक गाणी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी होती… आजही कुठल्याही खेळात भारताचा विजय झाला की एक गाणं हमखास वाजतं ते म्हणजे ‘चक दे इंडिया’ गाणं… या गाण्याचा एक खास किस्सा आहे चला जाणून घेऊयात…

तर, ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील हे गाणं तयार करताना अनेक अडचणी आल्या होत्या…. नुकत्याच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान संगीतकार सलीम-सुलेमान यांनी या गाण्यामागची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला या चित्रपटाचं नाव फक्त ‘चक दे’ असं ठरवण्यात आलं होतं. मात्र, आदित्य चोप्रा यांनी त्यात ‘इंडिया’ हा शब्द जोडला आणि भारतीय चित्रपटसृष्टी आणि शाहरुख खानच्या करिअरमधला हा एक महत्वाचा चित्रपट तयार झाला… (Bollywood News)
पुढे संगीतकार सुलेमान म्हणाले की, “चित्रपटाची कथा वाचून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. हा एक देशभक्तिपर चित्रपट होता, त्यामुळे गाणंही देशभक्तिपरच असावं असा आमचा विचार होता… आज प्रत्येकाच्याच आवडीचं हे गाणं तेव्हा मात्र तब्बल सात वेळा नाकारण्यात आलं होतं”… निर्मात्यांनी अनेकवेळा सलीम-सुलेमान यांना हे गाणं बदलण्यास सांगितलं होतं, परिणामी दोघंही चित्रपट सोडण्याच्या विचारात होते. पण, हा मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांनी त्यांचे गाणं तयार करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत.(Chak De India song story)

यानंतर सलीम म्हणाले की, “आदित्य चोप्रा (Aditya Chopra) म्हणाले होते की, ‘मला एक असं गाणं हवंय, जिथे भारत कोणतीही स्पर्धा जिंकली तरी हेच गाणं वाजलं पाहिजे. क्रिकेट असो, हॉकी असो, बुद्धिबळ असो… किंवा कोणतीही स्पर्धा असो, भारत जिंकताच संपूर्ण देश हे गाणं गुणगुणला पाहिजे. जसं जगभरात लोक ‘जुम्मा चुम्मा दे दे’वर नाचतात, तसंच काहीतरी मला हवं आहे.” हे ऐकल्यावर सलीम-सुलेमान यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या गाण्यातून प्रेरणा घेत ‘चक दे’ हा शब्द दोनदा वापरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार महिने काहीच सुचत नव्हतं, पण आदित्य चोप्रा यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर केवळ दोन तासांत हे गाणं तयार झालं….
================================
हे देखील वाचा : शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन
=================================
महत्वाचं म्हणजे ’चक दे इंडिया’ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील बॉक्स ऑफिसवर सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट होता…. पण, भारताने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध T-20 वर्ल्ड कप फायनल जिंकल्यावर जेव्हा त्या सामन्यात हे गाणं वाजलं, तेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे मोर्चा वळवला आणि चक दे इंडिया या गाण्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता प्रचंड वाढली… शिमीत अमित दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात ८५.८६ कोटी कमावले होते… गेल्या काही वर्षातील शाहरुखच्या करिअरमधला हा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला होता…(Shah Rukh Khan movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi