Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Dashavatar ने रचला इतिहास; १८ दिवसांत बाबुल मेस्त्रीच्या चित्रपटाने पार केला २० कोटांचा गल्ला!
२०२५ हे वर्ष आणि सप्टेंबर हा महिना मराठी चित्रपटांसाठी फार लकी ठरला आहे… दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाने लोकांना वेडं केलं आहे… १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची क्रेझ १८ दिवस उलटून गेले तरी दिवसागणिक वाढतच आहे… विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जॉली एल.एल.बी ३ या चित्रपटालाही दशावतारने टक्कर दिली आहे… जाणून घेऊयात १८ दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे..(Marathi movie 2025)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ लाख, दुसऱ्या दिवशी १.४ कोटी, तिसऱ्या दिवशी २.४ कोटी, चौथ्या दिवशी १.१ कोटी, पाचव्या दिवशी १.२५ कोटी, सहाव्या दिवशी १.३ कोटी, सातव्या दिवशी १.१५ कोटी कमवत पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण ९.२ कोटी कमावले होते… पुढे आठव्या दिवशी १ कोटी, नवव्या दिवशी २.६५ कोटी, दहाव्या दिवशी ३ कोटी, अकराव्या दिवशी ८ लाख, बाराव्या दिवशी ८ लाख, तेराव्या दिवशी ५५ लाख, चौदाव्या दिवशी ४५ लाख, पंधराव्या दिवशी ४५ लाख, सोळाव्या दिवशी १ कोटी, सतराव्या दिवशी १ कोटी, अठराव्या दिवशी २५ लाख कमवत चित्रपटाने एकूण कमाई आत्तापर्यंत २१.१५ कोटी कमावले आहेत… (Dashavatar box office collection)
================================
हे देखील वाचा : दिलीप प्रभावळकरांच्या Dashavatar चित्रपटापुढे अक्षयही पडला फिका!
=================================
दरम्यान, दशावतारचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे… कोकणातील दशावतार हा लोककलेचा प्रकार लोकांपुढे मांडत त्याला एक थाररक वळण या चित्रपटातून देण्यात आले आहे… तसेच, केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ‘दशावतार’ चित्रपटाचे शो सुरु असून परदेशातील मराठी लोकांचाही या चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे… या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांसोबत महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, भरत जाधव, विजय केंकरे, अभिनय बेर्डे यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत… (Dashavatar movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi