Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

“Anil Kapoor मोठा स्टार आहे असं…”; वर्षा उसगांवकरांनी सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar)… लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत वर्षा यांनी सुपरहिट चित्रपट दिलेच… पण हिंदीतही बऱ्याच दिग्गज कलाकारांसबोत त्यांनी स्क्रिन शेअर केली… एका मुलाखतीमध्ये त्यांनी अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला… विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी नाही तर मराठी होता… कोणता चित्रपट होता तो आणि काय आहे किस्सा जाणून घेऊयात…

तर, वर्षा उसगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘हमाल दे धमाल’… पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूरने कॅमिओ केला होता. चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंचा एका हमाल ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता… वर्षा उसगांवकर यांनी ‘मटा मनोरंजन’ला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) काम करण्याचा अनुभव सांगताना म्हटले की, “पहिल्याच भेटीत अनिल कपूरने हात मिळवला आणि तो म्हणाला,’हॅलो मी अनिल कपूर आहे आणि तु वर्षा आहेस ना…’त्याचं ते बोलणं ऐकून वाटलं मला छान वाटलं. थोडं अवघडल्यासारखं वाटतं होतं कारण एवढा मोठा स्टार आणि आपण त्याच्यासोबत कसं बोलणार. पण, तो आमच्यामध्ये छान रमला. त्याने आमच्यासोबत लंच केला आणि पूर्ण दिवस तो आमच्यासोबत होता. अजिबात असं जाणवलं नाही की तो मोठा स्टार आहे.”
================================
हे देखील वाचा : Mr India : अनिल कपूरच्या चित्रपटात सर्वाधिक खर्च खलनायकावर केला!
=================================
वर्षा उसगांवकरांनी यावेळी एका बॉलिवूड चित्रपटाचा किस्सा सांगताना म्हटलं,”मी शिकारी नावाचा हिंदी चित्रपट केला होत. त्यावेळी मी अनिल कपूरबरोबर उज्बेकिस्तानला गेले होते. तेव्हा अनिल आला होता कारण त्याने पण अशाच इंडो-रशियन चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यादरम्यान, फ्लाईटमध्ये आणि तिथे अनिल आणि मी सोबत होतो. त्यावेळी देखील त्याने मुद्दामहून हमाल दे धमाल चित्रपटाच्या आठवणी काढल्या. ते पाहून मला खूप छान वाटलं. अशा गोड आठवणी वर्षा यांनी शेअर केल्या. दरम्यान, हमाल दे धमाल चित्रपटात वर्षा उसगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच रविंद्र बेर्डे, सुधीर जोशी, निळू फुले, अशोक शिंदे या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi