Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Tere Ishq Mein : ‘रांझना’नंतर धनुष दिसणार शंकरच्या भूमिकेत; चित्रपटाचा मन हेलावणारा टीझर रिलीज
बॉलिवूडमध्ये लव्हस्टोरीचे वेगवेगळे वर्जन्स आजवर आले आहेत… शाहरुख खान, सलमान खान, ह्रतिक रोशन यांच्या रोमॅंटिक चित्रपटांची धाटणी वेगळी आहे… अशातच २०१३ मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांझना’ (Ranjhana) हा चित्रपट आला आणि त्याने तरुणाईला अक्षरश: वेडं केलं… धनुष आणि सोनम कपूर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची कथा जितकी प्रभावी आणि मनाला भिडली तितकंच संगीतही भावलं… कारण ‘रांझना’ चित्रपटाला संगीत दिलं होतं ए.आर.रेहमान यांनी… आणि आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग किंवा त्याच पठडीतील आणखी एक लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे… ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein) असं चित्रपचाचं नाव असून यात धनुष आणि क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत…(Bollywood upcoming movie)

दरम्यान, नुकतीय ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाची पहिली झलक सोशल मिडियावर रिलीज करण्यात आली… टीझरच्या सुरुवातीला मुक्तीच्या (क्रिती सनेॉन) हळदीचा कार्यक्रम सुरु असतो आणि तिथे शंकर (धनुष) जखमी अवस्थेत येतो… मुक्ती त्याला पाहून शॉक होते.’अपने पिता तो बनारस मे जलाके आया हूँ, सोचा तेरे लिये गंगाजल लेता हूँ. नयी जिंदगी शुरु कर रही है, पुराने पाप तो धोले’ असा जबरदस्त डायलॉग बोलतो. मुक्तीच्या डोक्यावर गंगाजल ओततो. नंतर धनुषचा अॅक्शन अवतार, क्रितीचा सिगारेट आणि दारुमध्ये बुडालेला सीन आणि शेवटी मुक्ती-शंकरच्या प्रेमातील आगीचा थरारक सीन आहे. ‘शंकर करे तेरे घर बेटा हो, तुझे पता चले इश्क मे जो मर जाते है वो भी किसी के बेटे होते है’ असा एक धनुषचा टीझरमधील प्रत्येक डायलॉग अंगावर काटा आणणारा आहे. (Kriti Sanon & Dhanush)

‘तेरे इश्क मे’ चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद राय (Anand L Rai) यांनीच केलं असून संगीत दिग्दर्शन ए.आर रहमान (A R Rehman) याचं आहे… त्यामुळे रांझा प्रमाणेच हा चित्रपटही बॉलिवूडमध्ये इतिहास रचणार हे काहीसं फिक्स झालं आहे… चित्रपटाच्या टीझरला बॅकग्राऊंडमध्ये ‘तेरे इश्क मे क्या से क्या बना, तेरे इश्क मे हो रहा फना’ हे गाणं एका वेगळ्याच जगात घेऊन जातं.. धनुषने ‘रांझना’मध्ये कुंदनच्या भूमिकेतून सर्वांना प्रेमात पाडलं होतं… आता शंकरच्या भूमिकेतून आग लावणार हे निश्चित आहे… प्रेम, विरह, विश्वासघात यांचा मिलाफ असणारा हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे…
================================
हे देखील वाचा : Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; Pradaला टोमणा मारत बेबो म्हणाली…
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi