Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘दशावतार’ (Dashavatar movie) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे… २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला असून बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांना कोकणातल्या दशावतारने धुळ चारली आहे… १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झाला होता… आता २१ दिवस उलटून गेले असले तरी दशावतारने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे… जाणून घेऊयात २१ दिवसांमध्ये दशावतारने किती कमाई केली आहे…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ लाख कमवत ओपनिंग केली होती… त्यानंतर या चित्रपटाची गाडी सुसाटच सुटली… आत्तापर्यंत दशावतारने २१.९८ कोटी कमवत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा रेकॉर्ड केला आहे… विशेष म्हणजे ‘जॉली एल.एल.बी ३’, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘कांतारा १’ या चित्रपटांनाही दशावतार सामना करत आहे…. आता हा चित्रपट ५० कोटींचा पल्ला येत्या काळात पार करेल का याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलं आहे… (Dashavatar box office collection)
================================
=================================
‘दशावतार’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली ‘बाबुली मेस्त्री’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तसेच, या चित्रपटात त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या दमदार अभिनयामुळे या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला चांगली ‘वर्ड ऑफ माऊथ’ पब्लिसिटीचा फायदा मिळत आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi