Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदकप पुरस्कार जाहीर झाला आहे… आजवर मालिका आणि चित्रपटांसोबतच रंगभूमीवर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची ही एक महत्वाची पोचपावती नक्कीच आहे…
नीना कुळकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री तर आहेतच पण त्यासोबतच त्यांनी लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका या भूमिका देखील लीलया सांभाळल्या आहेत..मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर तसेच चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपलं योगदान दिलं आहे.

नीना कुळकर्णी यांचा कलेचा प्रवास १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगपासून सुरू झाला… त्यांच्या अभिनयाची सुरुवात व्यावसायिक मराठी नाटक ‘गुंतता हृदय हे’ मधून झाली होती… पुढे पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या महान रंगकर्मीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘आधे अधूरे’, ‘मायावी सरोवर’, ‘अबे बेवकूफ’, ‘आह’, आणि ‘एज्युकेटिंग रीटा’ यांसारख्या हिंदी प्रयोगशील नाटकांमध्येही कामं केली..

पुढे १९७८ मध्ये डॉ. विजया मेहता यांनी त्यांना मराठी नाटक ‘हमीदाबाईची कोठी’ मध्ये शब्बोची भूमिका दिली आणि या नाटकाने इतिहास रचला… अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनातही उत्तुंग कामगिरी केली.. ‘महासागर’ नाटकाची पुनर्निर्मिती केली तसेच, ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’ आणि त्याची हिंदी आवृत्ती ‘डॉक्टर आप भी’ यासारखी नाटके दिग्दर्शित केली. ‘सावित्री’, ‘अकस्मात’, ‘ध्यानीमनी’, ‘सर्वस्वी तुझीच’, ‘वटवट सावित्री’, ‘आईचं घर उन्हात’, ‘देहभान’, ‘प्रेमपत्र’, आणि ‘असेन मी नसेन’ मी यांसारख्या नाटकांतही उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत… (Neena Kulkarni)
================================
हे देखील वाचा : Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!
=================================
अभिमानाची बाब म्हणजे नीना कुळकर्णींनी इंग्रजी रंगभूमीवर ‘महात्मा व्हर्सेस गांधी’, आणि ‘वेडिंग अल्बम’ यांसारख्या नाटकांत भूमिका साकारल्या. सध्या त्या सांगीतिक नाटक गौहर मध्ये मालिका ए जान आणि वृद्ध गौहर जान या दुहेरी भूमिका साकारत आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi