Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड
मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट ‘पिंजरा’ (Pinjara Movie) आजही ५० वर्ष उलटून गेली तरी तितकाच ताजा वाटतो. आपल्या सदाबहार नृत्याने आणि अभिनयाच्या आगळ्या-वेगळ्या छटेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचं काल रात्री उशिरा मुंबईतील राजकमल स्टुडिओ येथे निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्या यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. संध्या यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

२० सप्टेंबर १९३२ रोजी संध्या यांचा जन्म झाला. पुढे नृत्य आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. संध्या शांताराम यांनी व्ही शांताराम यांच्या ‘अमर भूपाली’ या चित्रपटातून १९५२ मध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं… संध्या यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत ‘दो आखे बारह हात’ या चित्रपटात सोबत काम केले होते. तसेच व्ही शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’, ‘जल बीन मछली नृत्य बीन बिजली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कामं केली. ‘पिंजरा’ या चित्रपटातील तिची भूमिका फारच गाजली होती. पुढे ‘परछैन’, ‘तीन बत्ती चार रास्ता’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘नवरंग’, ‘स्त्री’, ‘सेहरा’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयासह आपलं नृत्य कौशल्यही सादर केलं होतं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi