
Female Centric Movies : मराठी चित्रपटसृष्टीत ‘स्त्री’शक्तीचा जागर!
स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे उर्जा… स्त्रीची विविध रुपं आपण जाणतोच… घर सांभाळण्यापासून ते अगदी व्यवसाय चालवण्यापर्यंतचा प्रवास एकटी स्त्री पुर्ण करत असते… सध्या जगात असं कुठलंही क्षेत्र नसेल जिथे महिला कार्यरत नसतील… प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे… अशातच नुकत्याच संपन्न झालेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एक आगळावेगळा प्रयोग प्रेक्षकांपर्यंत येणार आहे… विशेष म्हणजे ही कलाकृती पुर्णपणे स्त्रियांनी तयार केली आहे… ‘लग्न आणि बरंच काही’ (Lagna ani Barach Kahi marathi movie) असं या चित्रपटाचं नाव असून २०२६ च्या महिला दिनाचं औचित्य साधून हा चित्रपट रिलीज होणार आहे…

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतल विविध विषय हाताळले जात आहेत.. कौटुंबिक, हॉरर-कॉमेडी किंवा दशावतार सारखे आपल्या मराठी मातीत रुजलेले विषय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत असल्यामुळे प्रेक्षकांना इतर भाषिक चित्रपटांप्रमाणेच आपले मराठी कलाकार पुन्हा एकदा समृद्ध कथानकाकडे घेऊन जात आहेत… याच प्रवाहात पहिल्यांदाच महिला चित्रपटाच्या मेकिंग पासून ते अगदी रिलीज पर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत… (Marathi movies 2026)
लग्न आणि बरंच काही या चित्रपटातून स्त्रीचं आयुष्य हे केवळ घरातल्या जबाबदाऱ्यांमध्येच गुंतलेलं नसून तिच्या इच्छा, आकांक्षा आणि तिच्या आयुष्यातील नातेसंबंधावर भाष्य करणार आहे… या चित्रपटाचं दिग्दर्शन वेदांती दाणी करणार असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली नान्नजकर यांच्या देखरेखीखाली होणार आहे. चित्रपटाची कथा यशश्री मसुरकरने लिहिली असून, छायाचित्रण स्मिता निर्मल, संगीत वैशाली सामंत, एडिटिंग भक्ती मायाळू, प्रोडक्शन डिझाईन मुग्धा कुलकर्णी, ब्युटी आणि स्टायलिंग सुप्रिया शिंदे, पीआर प्रज्ञा सुमती शेट्टी आणि डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर करणार आहेत… तसेच, चित्रपटात पूजा सावंत (Pooja sawant) आणि शर्मिला शिंदे या प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसणार आहेत…(Marathi Entertainment news)
================================
हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
=================================
‘उंबरठा’, ‘आनंदी गोपाळ’, ‘हिरकणी’, ‘माहेरची साडी’, ‘बंदिशाळा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा’ असे बरेच महिला प्रधान चित्रपट आजवर मराठीत आले… सुमित्रा भावे यांनी त्यांच्या समृद्ध दिग्दर्शनातून काही महिलाप्रधान चित्रपटांचं दिग्दर्शन मराठीत केलं… परंतु, फारशा महिलांनी Female Centric चित्रपट केवळ भूमिका साकारण्यापलिकडे केले नाहीत… मात्र, आता ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाच्यानिमित्ताने स्त्रियांच्या भोवती गुंफण्यात आलेल्या कथेच्या प्रत्येक धाग्यात एक महिला तिच्या गाठीशी असणारा अनुभव त्यात विणताना नक्कीच दिसणार आहे… तसेच, मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच सर्व महिलांनी मिळून केलेला हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल हीच इच्छा… (Female Centric movies in india)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi