‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Shubhvivah मालिकेत येणार मोठा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एंट्री !
स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांची आवडती असलेल्या ‘शुभविवाह’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शुभविवाह या मालिकेत आता तब्बल सात वर्षांचा लीप घेतलाजाणार असून एक नव पात्र ही आपल्याला पहायला मिळणार आहे. मालिकेत एक नवा पात्र एसीपी अपूर्वा पुरोहितची आता एंट्री होणार आहे. आणि या पात्रात सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या भूमिकेतून पहिल्यांदाच पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.(Actress Apurva Nemlekar )

अपूर्वा नेमळेकर आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हणते की, “स्टार प्रवाहसोबत माझं एक खास नातं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हणालं होतं, आणि आज त्या इच्छेची पूर्तता होणार आहे. ‘शुभविवाह’मध्ये मी एसीपी अपूर्वा पुरोहित या पात्रात दिसणार आहे, आणि पहिल्यांदाच धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून येणार आहे.”

अपूर्वा पुढे अस ही म्हणाली, “नवं पात्र साकारताना नेहमीच एक उत्सुकता असते. या भूमिकेतून मी एकदम वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीत ही एक नवा वळण असणार आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत मधुरा देशपांडे सोबत १३ वर्षांनंतर पुन्हा काम करण्याचा आनंद मिळणार आहे. ‘आराधना’ मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं, आणि मधुरा माझी चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे काम करताना धमाल येणार आहे.”(Actress Apurva Nemlekar )
=================================
=================================
अपूर्वा पुरोहितची एंट्री ‘शुभविवाह‘ मालिकेत एक मोठा बदल घेऊन येणार आहे हे नक्की . तिच्यायेण्याने भूमी आणि आकाश यांच्या आयुष्यातएक वेगळ वळण येणार, अशी तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या धडाकेबाज एंट्रीमुळे मालिका आणखी रंगतदार होईल, हे नक्की. त्यामुळे, ‘शुभविवाह‘ मालिकेचा येणारा भाग दुपारी २:३० वाजता पाहता येणार आहे.