‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Damini 2.0: नव्वदचं दशक गाजवणारी ‘दामिनी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकार दिसणार महत्वाच्या भूमिकेत !
अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिने साकारलेली दामिनी आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ठरली . आता पुन्हा एकदा “दामिनी” मालिकेच्या प्रेमात पडण्याची वेळ आली आहे! पत्रकारितेच्या जगतावर आधारित ‘दामिनी’ ही पहिली मराठी दैनंदिन मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली आणि नव्वदच्या दशकात ती प्रेक्षकांच्या हृदयात घर करुन बसली. आता ‘दामिनी’ मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली असून, तशाच उत्साहाने तिचा सिक्वेल, ‘दामिनी 2.O’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दूरदर्शनच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवर ‘दामिनी 2.O’ चा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात प्रेक्षकांना एक भव्य आणि दर्जेदार शीर्षक गीतासह ‘दामिनी 2.O’ चा नवा रूप पाहायला मिळणार आहे.(Damini 2.0)

“अन्यायाविरुद्ध नेहमीच ठामपणे उभी राहिलेली निर्भीड पत्रकार दामिनी पुन्हा एकदा आपल्यासमोर येतेय… नव्या रुपात नव्या ताकदीसह. फक्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर”, असं म्हणत मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये पत्रकार दामिनी त्याच कॉन्फिडन्समध्ये कॅमेरासमोर उभी राहून रिपोर्टिंग करताना दिसतेय.

1997 ते 2007 या कालावधीत ‘दामिनी’ ही मालिका दूरदर्शन सह्याद्रीवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिने दामिनीची अत्यंत प्रभावी भूमिका साकारली, जी आजही प्रेक्षकांच्या मनात ठळकपणे राहिली आहे.’दामिनी’ ही मालिका प्रतिक्षा लोणकरच्या करिअरला एक नवा वळण देणारी ठरली. तिच्या अभिनयाच्या कलेला या मालिकेने एक नवा मुकाम दिला, आणि तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या मालिकेने प्रतिक्षाला एक विशेष स्थान दिलं आणि तिच्या अभिनयातील उत्कृष्टतेला नव्या उंचीवर नेलं. या मालिकेचा थोडक्यात उल्लेख केला तरी, त्या काळात दामिनीने सगळ्या वयोमानानुसार प्रेक्षकांची मनं जिंकली होती, आणि आजही ती त्या काळाची एक महत्वपूर्ण गोष्ट ठरली आहे.(Damini 2.0)
===============================
हे देखील वाचा: Shubhvivah मालिकेत येणार मोठा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एंट्री !
===============================
आता ही नवी मालिका १३ ऑक्टोबरला सुरु होणार आहे. या नव्या मालिकेत साक्षी कुलकर्णी दामिनीच्या भूमिकेत दिसणार आहे . प्रतिक्षा लोणकरच्या पंरपरेचा आदर राखत, साक्षी दामिनीच्या व्यक्तिमत्वाला एक ताज्या दृष्टिकोनातून साकारत आहे. अभिनेता ध्रुव दातार आणि क्षिति जोग ही या मालिकेत एक महत्त्वाचा पात्र असेल, जो दामिनीच्या कथेच्या महत्त्वपूर्ण वळणांमध्ये दिसेल. तसेच या मालिकेत अभिनेता सुबोध भावे ही महत्वाच्या भूमिकेत असणारआहे.