‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

आपल्या संस्कृतीचा… हिजाब घातल्यामुळे Deepika Padukone ट्रोल
सध्या अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) चर्चेचा खास विषय ठरली आहे… एकीकडे लागोपाठ दोन साऊथ आणि एका हिंदी चित्रपटातून तिचा पत्ता कट झाल्यानंतर तिच्याबद्दल बी टाऊनमध्ये बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु असताना आता दीपिका हिजाब परिधान केल्यामुळे ट्रोल झाली आहे… दीपिका व रणवीर सिंग अबूधाबीला गेले असताना त्यावेळचा एक व्हिडीओ रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. रणवीर आणि दीपिकाने अबूधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत काम केलं होतं.. याच जाहिरातीत तिने हिजाब घातल्यामुळे दीपिकाने पुन्हा एकदा आपल्या भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचं बोललं जात आहे…

सोशल मिडियावर सध्या दीपिका आणि रणवीरचा हा फोटो व्हायरल झाला असून लोकांनी या फोटोंवर कमेंट करत दीपिकाला ट्रोल केलं आहे… एका नेटकऱ्याने दीपिकाच्या Vouge ला दिलेल्या मुलाखतीची आठवण करुन दिली आहे.. या मुलाखतीमध्ये दीपिकाने टिकली लावयाची की नाही हा माझा निर्णय असल्याचं म्हटलं होतं… आणि आता हिजाब घालून जाहिरात करतेय हे थांबवायला हवं, टिकली लावायची की नाही हा जर तुमचा निर्णय असेल तर तुम्ही याचीही जाहिरात का करत आहात असं म्हटलं आहे…

तर, आणखी एका नेटकऱ्याने दीपिका रणवीरच्या या व्हिडीओबद्दल एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “ही लोकं तिकडे जातात तेव्हा पूर्णपणे मुस्लीम पद्धतीचा पोशाख परिधान करतात; पण एरवी ते चित्रपटात मात्र छोट्या कपड्यांमध्ये दिसतात.” आता काही दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांनी त्यांचं समर्थनही केलेलं दिसतंय… पण त्यारहून जास्त दोघांना निगेटीव्ह कमेंट अधिक आल्यामुळे इंडस्ट्रीत दीपिकाची इमेज डाऊन होत असल्याचं दिसून येत आहे…
बरं, दीपिका कपड्यांमुळे या आधी देखील ट्रोल झाली आहे… शाहरुख खान आणि तिची प्रमुख भूमिका असणाऱ्या पठाण चित्रपटात तिने भगव्या रंगाची बिकनी घातल्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या होत्या… भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्माचा तिने अवमान करण्याचा प्रयत्न केल्याच्या टीका तिच्यावर झाल्या होत्या.. आणि आता हिजाब परिधान केल्यामुळे पुन्हा एकदा तिने लोकांच्या भावना दुखाव्या आहेत असं म्हटलं जात आहे… आता यावर दीपिका पादूकोण काही प्रतिक्रिया देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे…
================================
हे देखील वाचा : Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?
=================================
दरम्यान, दीपिका पादूकोण हिची साऊथच्या दोन बिग बजेट चित्रपटांमधून एक्झिट झाली आहे… संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit) आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे… ८ तासांची शिफ्ट असावी अशी दीपिकाची मागणी होती असं तिने स्वत: मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.. परंतु, साऊथच्या दिग्दर्शकांनी तिच्या प्रोफेशनल एटीकेट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे तिला दोन चित्रपटांपासून हात धुवावा लागला… याव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘द इंटर्न’ चित्रपटात स्क्रिन शेअर करणार होती; पण आता या देखील चित्रपटातून ती बाहेर पडली असून केवळ निर्माती म्हणून ती काम पाहणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi