‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Cannes Film Festival 2026 साठी माईसाहेब मराठी चित्रपटाची झाली निवड
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी समोर येत आहे… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘माईसाहेब : डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ या चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे… २०२६ मध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगरमधून निर्मिती करण्यात आलेल्यो या चित्रपटाची अधिकृत निवड झाल्याचे पत्र मिळाल्याची माहिती लेखक, निर्माते-दिग्दर्शक प्रकाश त्रिभुवन यांनी दिली आहे.

दरम्यान, या चित्रपटाबाबत त्रिभुवन म्हणाले की, ‘माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ या चित्रपटातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अर्धांगिनी माईसाहेब यांच्या वाट्याला आणले गेलेले खडतर आयुष्य पारदर्शकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माईसाहेब यांच्याविषयी फार कमी लोकांना माहित असल्यामुळे त्यांचे आयुष्य नेमके कसे होते, याविषयी जनतेत उत्सुकता आहे. माईसाहेबांची ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात..’ या आत्मचरित्रात माहिती लिहिली असून चित्रपट तयार करताना त्याचा उपयोग झाला आहे…
================================
हे देखील वाचा : Rukmini Vasanth : ‘कांतारा – चॅप्टर १’ मधली ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
=================================
‘माईसाहेब : डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ या चित्रपटात शैलेश दातार यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली असून त्यांच्यासोबत चित्रपटात पल्लवी पालकर, शंतनू मोघे, माधव अभ्यंकर, कमलेश सावंत, अनिल नगरकर, डॉ. विजयकुमार देशमुख, शाहिरा सीमा पाटील हे प्रमुख भूमिकेत असून स्थानिक आणि महाराष्ट्रातील नामांकित कलावंत आहेत. हा चित्रपट नोव्हेंबर २०२५ ला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi