‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ गाजवल्यानंतर Mdhavi Nimkar पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणयासाठी सज्ज !
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत “शा…लि…नी” म्हणत ठसक्यात संवाद फेकणारी अभिनेत्री माधवी निमकर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. जवळपास साडेचार वर्षं छोट्या पडद्यावर राज्य केल्यानंतर मालिकेचा शेवट झाला, पण त्या मालिकेतील पात्रं आणि त्यांची अॅक्टिंग आजही लोक विसरलेले नाहीत. अलीकडेच मालिकेतील काही कलाकार नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता मात्र चाहत्यांची एक जुनी इच्छा पूर्ण होताना दिसतेय. कारण ‘शालिनी’ची भूमिका साकारणारी माधवी निमकर पुन्हा एका नव्या मालिकेतून पुनरागमन करत आहे. तिच्या या कमबॅकमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.(Actress Madhavi Nimkar)

ही एक नवी कौटुंबिक मालिका असणार आहे, मात्र या मालिकेचंशीर्षक अद्याप गुपित ठेवण्यात आलं आहे. निर्मात्यांकडून अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. माधवी निमकर नेमकी पुन्हा एकदा खलनायिकेची भूमिका साकारणार की यावेळी काहीतरी वेगळं रूप दाखवणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘शालिनी’च्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली माधवी पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार असल्याचं समजताच तिचे चाहते आनंदित झाले आहेत.

तिच्या दमदार अभिनयामुळे आणि प्रभावी संवादफेकीमुळे ती कोणत्याही मालिकेचं आकर्षण ठरते, त्यामुळे या नव्या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्साह आणि चर्चा दोन्ही वाढताना दिसत आहेत. आता या मालिकेतून माधवी कोणत्या नव्या अंदाजात दिसते, हे पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. माधवी निमकर अनेक वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांच्या दुनियेत आपलं स्थान निर्माण करत आहे. ती केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येही काम करताना दिसली आहे. तिच्या करिअरमध्ये ‘अवघाची संसार’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकांचा समावेश आहे. तसेच तिने ‘संघर्ष’, ‘नवरा माझा भवरा’, ‘सगळं करून भागलं’, ‘धावाधाव’, ‘बायकोच्या नकळत’ यांसारख्या सिनेमांमध्येही आपला अभिनय दाखवला आहे. माधवीला फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर सोशल मीडियावरही प्रचंड चाहता वर्ग आहे, जे तिच्या लोकप्रियतेचं प्रमाण दर्शवतं.(Actress Madhavi Nimkar)
===============================
===============================
माधवी निमकरच्या करिअरमध्ये ‘शालिनी’ या भूमिकेने विशेष महत्त्व मिळवलं. माधवीच्या मते, कलाकारासाठी प्रयोगशील असणं अत्यंत गरजेचं आहे. ‘शालिनी’ साकारताना तिला सुरुवातीला खूप भीती वाटत होती, कारण बोलीभाषा वेगळी होती आणि तिला कदाचित पात्र जमत नसेल, अशी शंका होती.पण संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे ती पात्राला पूर्ण न्याय देऊ शकली. माधवी सांगते की, “मला स्वतःला आव्हानात्मक पात्रं साकारायला आवडतात आणि भविष्यातही असेच आव्हान घेण्यास उत्सुक राहीन.” यामुळे आता प्रेक्षक माधवीच्या नव्या भूमिकेबाबत प्रचंड उत्सुक आहेत.