‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

शारीरिक अन् मानसिक छळ, घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली Mayuri Wagh
मराठी मालिका आणि चित्रपटविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ ‘अस्मिता’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली… या मालिकेदरम्यानच अभिनेता पियुष रानडे सोबत तिची मैत्री झाली आणि दोघांनी लग्न केलं… पण काही काळानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला… आज बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच मयुरीने तिच्या घटस्फोटाबद्दल आणि मानसिक व शारिरिक छळाबद्दल भाष्य केलं आहे… (Mayuri Wagh Marriage and Divorce)
मयुरी वाघने सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान लग्नाबद्दल बोलताना मयुरी म्हणाली की, ‘मला आता कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाही आहे. पण, मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं. कारण, मी आताची पिढी पाहतेय, लोकं खूप काही तरी करुन मगच लग्न करतात. हे मी केलं नाही…पण, आताच्या मुली फार सॉर्टेड आहेत. एक एक्स अमाऊंट पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर असायला पाहिजे, कुटुंबात या गोष्टी पाहिजेत हे अलीकडच्या काळात लग्न करताना पाहिलं जातं. पण, माझ्या बाबतीत असं झालं नाही.’

पुढे बोलताना मयुरी म्हणाली की, “तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल. पण, तरीही त्यांनी पाठिंबा दिला. लग्न झान्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच मला जाणवलं होतं आपला लग्नाचा निर्णय चुकला पण, मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला”.. (Marathi Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
================================
मयुरीने पुढे असं देखील सांगितलं की, “माझ्या आई-बाबांना ४ महिन्यांत समजलं होतं की, हे सगळं चुकलंय पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे गेली. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूप वेळ लागला. पण, आता जाणवतं की, ह्या सगळ्याचा विचार मी आधी का नाही केला? या सगळ्यातून बाहेर यायला मला सहा महिने लागले. तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले. मी मासे आणून ठेवले होते घरात, मी त्यांच्यासोबत बोलायचे कारण मी एकटी होते. माझ्या आई-बाबांना काही सांगू शकत नव्हते. मालिकेतही रोमँटिक ट्रॅक सुरू होता, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र सेपरेशनचा काळ सुरू होता. काही गोष्टी मी विचारल्यासुद्धा. पण त्यावर मला स्पष्टीकरण मिळालं. मी विश्वास ठेवला. पण जेव्हा मला रिअॅलिटी चेक मिळाला तेव्हा मी ठरवलं आता कुणावर विश्वास ठेवायचा नाही”… यावेळी मयुरीने लग्नात माझा मानसिक आणि शारिरिक छळ झाल्याचंही उघडपणे सांगितलं… दरम्यान, आया पियुष रानडे याने अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्यासोबत २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली असून हे त्याचं तिसरं लग्न आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi