स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

एकेकाळी Oscars मध्ये पोहोचला होता, आता चालवतो रिक्षा!
OSCAR AWARDS… नाव जरी घेतलं तरी अशी रॉयल फिलिंग येते… आणि या AWARDS मध्ये पोहोचणाऱ्या सिनेमांची बातच काय और असते. भारताच्या अशा तीन चित्रपटांनी ऑस्करपर्यंत मजल मारली. ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये भारताकडून ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ हे चित्रपट पोहोचले होते. यातील मीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटात एक बालकलाकार प्रचंड गाजला होता. तो म्हणजे शफिक सय्यद…

मुव्हीमध्ये त्याचं नाव कृष्णा आणि चायपाव होतं. त्याच्या चित्रपटातल्या कामाचं सगळीकडेच कौतुक झालं. इतकच काय तर १९८९ चा बेस्ट CHILD ACTOR चा NATIONAL AWARD सुद्धा त्याला मिळाला. यासोबतच हा चित्रपट फक्त ऑस्कर नव्हे, तर बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब या पुरस्कारांमध्येही चमकला. शफिकला भलतीच प्रसिद्धी मिळाली… पण आज ३५ वर्षानंतर त्याची हीच प्रसिद्धी झाकोळली आहे आणि गरिबीमुळे सध्या त्याला रिक्षा चालवावी लागत आहे.
================================
हे देखील वाचा : दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!
================================
‘सलाम बॉम्बे’नंतर त्याला १९९३ सालच्या पतंग चित्रपटात संध मिळाली होती. मात्र त्यानंतर तो जो गायब झाला, तो थेट रिक्षा चालवतानाच दिसून आला. असं म्हटलं जात की प्रसिद्धीनंतर आलेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची आई आणि चार मुलं आहेत.
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi