Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं”; ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाबद्दल Mahesh Manjrekar यांची प्रतिक्रिया
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित-अभिनित ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता… सेन्सॉर बोर्डासह उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवूनही पुण्यात या सिनेमाचे दोन शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले होते. यानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला होता… आता हा चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावासह रिलीज झाला असून यावर आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे… (Mahesh Manjrekar)

‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, @‘मना’चे श्लोक सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी बरेच नट पुढे आले. पण, त्यांनी एक तासात नाव बदलण्याचा निर्णय घेतला…ते का नाही थांबले? थांबूदेत की…मी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ सिनेमाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो. मी नाही म्हणजे नाही सांगितलं…अजिबात नाव बदलणार नाही! यामुळे समोरच्या लोकांना प्रोत्साहन मिळतं की, आपण परत यांच्यावर हल्ला केला की, परत हे नाव बदलतील. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ याबाबतीत सांगायचं झालं तर, ही शिवी वगैरे नव्हती…आयचा घो म्हणजेच कोकणात ‘आईचा नवरा’. कोणाला तरी वाटलं ती शिवी आहे. पण, यामुळे कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या नव्हत्या आणि असं नाव मी ठेवतच नाही. तसंच ‘मनाचे श्लोक’ ही एक मनवा आणि श्लोक यांची गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं.” (Mrunmayee Deshpande News)
पुढे मांजरेकर असं देखील म्हणाले की, “जर सेन्सॉरने पास केलंय तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये या ठाम मताचा मी आहे. पण, तुम्ही सुद्धा ठाम राहा! हिंदीत सुद्धा असंच होतं. अलीकडे बरेच सिनेमे निघतात, त्यात प्रोपगंडा चित्रपटांचाही समावेश असतो. पण, हे प्रेक्षकांच्या हातात आहे की, अशा चित्रपटांना जायचं की नाही”…
================================
हे देखील वाचा : ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!
================================
दरम्यान, येत्या ३१ ऑक्टोबरला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट रिलीज होणार आहे… त्यामुळे आता या चित्रपटात महाराजांची कोणती महत्वाची बाजू लोकांसमोर येणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi