Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: अमालमुळे वडील डब्बू मलिकही रडले, सलमाननेही दिली वॉर्निंग; ‘वीकेंड का वार’मध्ये असं काय घडलं?
‘बिग बॉस 19’ चा सध्याचा आठवडा प्रेक्षकांसाठी भावनांचा रोलरकोस्टर ठरला आहे. घरात वाद, भावना आणि संताप यांचा कडेलोट झाला आहे. विशेषत: अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांच्यात झालेला तीव्र वाद सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. या आठवड्यात घरातील जवळजवळ सर्व स्पर्धकांनी फरहानावर निशाणा साधला होता. वादाची ठिणगी एका कॅप्टनसी टास्कदरम्यान पडली, जिथे प्रत्येक स्पर्धकाला आपल्या घरातून आलेली पत्रं देण्याची वेळ आली होती. त्या टास्कमध्ये फरहाना हिच्याकडे निलमचं पत्र आलं होतं, मात्र तिने कॅप्टनसी जिंकण्यासाठी ते फाडण्याचा निर्णय घेतला. यामुळे घरातील सदस्य संतापले, आणि वाद पेटला.(Bigg Boss 19)

रागाच्या भरात अमाल मलिकने फरहाना हिच्याशी मोठा वाद घातला आणि तिच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याने रागात म्हटलं की, “तू आणि तुझी आई बी-ग्रेड आहे.” या वक्तव्यानंतर घरातील सदस्य आणि प्रेक्षक दोघेही संतप्त झाले. सोशल मीडियावर अमालवर टीकेची झोड उठली आहे.

आता नुकताच निर्मात्यांनी ‘वीकेंड का वार’चा प्रोमो जाहीर केला असून त्यात सलमान खान अमालची जोरदार क्लास घेताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये सलमान संतापलेला दिसतो आणि तो अमालला विचारतो, “देवाने तुला खायला अन्न दिलं, मग दुसऱ्याच्या ताटात हात घालण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू फरहानाच्या आईबद्दल असं बोललास, तुला वाटतं ते योग्य आहे?” यावर अमालने उत्तर दिलं की, “मी ट्रिगर झालो होतो…”(Bigg Boss 19)
=============================
=============================
या प्रकरणानंतर अमालचे वडील डब्बू मलिक देखील शोमध्ये येणार आहेत. त्यांनी मुलाला समजावताना म्हटलं की, “येथे बोल, भांड पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव. असं वागणं माझ्या कपाळी लिहू नकोस.” ‘बिग बॉस 19’चा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. सलमान खानच्या फटकारणीमुळे आणि वडिलांच्या समजुतीमुळे अमाल पुढे कसा बदलतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, या वादानंतर घरातील वातावरण अधिकच तापलेलं आहे, आणि पुढील भागांमध्ये काय नवं घडतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.