
Bollywood : ना खान, ना बच्चन, ना कपूर्स; हे आहे बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब
बॉलिवूडमध्ये कुठल्या कलाकाराचा कोणता चित्रपट येतोय त्यापेक्षा कोणत्या कलाकारचं कुणाशी अफेअर आहे किंवा कोणाची किती संपत्ती आहे हे जाणून घेण्यात लोकांना उत्सुकता अधिक असते… आणि करोडोंच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या यादीत शाहरुख खान, अमितभ बच्चन, सलमान खान, कपूर कुटुंब यांची नावं नक्कीच येतील… पण तुम्हाला माहित हे का इंडस्ट्रीत खान्स नाही तर एक भलतंच कुटुंब सर्वात श्रीमंत मानलं जातं.. कोण आहे ते जाणून घेऊयात..
तर, बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब बच्चन, कपूर्स, खान किंवा चोप्रा नसून ते आहेत टी-सीरिजवाले कुमार, ज्यांनी गेले अनेक वर्ष म्युझिक इंडस्ट्रीत राज्य केलं असून निर्माते म्हणूनही ते बरीच वर्ष काम करत आहेत… मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या घडीला टी-सीरिजच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे, १० हजार कोटींची आहे. यामुळेच ते बॉलिवूडच्या दिग्गजांच्या कुटुंबांना मागे टाकतात.

टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची ओळख बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत निर्माते अशी आहे… मीडिया रिपोर्टनुसार, भूषण कुमार आणि त्यांच्या कुटुंबाकडे अंदाजे 10,000 कोटींची मालमत्ता असून भूषण कुमार हे टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांचे काका कृष्ण कुमार यांच्यासोबत कंपनी चालवतात. संगीतापासून सुरू झालेला हा वारसा आता चित्रपट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पसरला आहे.
================================
हे देखील वाचा : ६६ पुरस्कार जिंकणारी Hindi Web series आहे तरी कोणती?
================================
1983 मध्ये गुलशन कुमार टी-सीरीजची सुरुवात केली होती… म्युझिक कॅसेट्सच्या नव्या ट्रेंडमुळे गुलशन कुमार यांनी त्यांची व्यावसायिक कौशल्यता दाखवत गाणं घराघरांत पोहोचवलं… आमिर खान आणि जुही चावला यांच्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील गाण्यांनी गुलशन कुमार यांच्या टी-सीरीजला नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘आशिकी’ सिनेमा आला, ज्याची गाणी रेकॉर्डब्रेक हिट झालं आणि टी-सीरीज घराघरात पोहोचलं. टी-सीरीजनं गाण्यांसह फिल्म इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवला आहे. ‘भूल भुलैया 2’, ‘तू झूठी मैं मक्कार’, ‘भूल भुलैया ३’, ‘मेट्रो अशा बऱ्याच चित्रपटांची निर्मीत त्यांनी केली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi