Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Parineeti Chopra आणि राघव चड्डा यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन!
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी आली आहे… अभिनत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे… १९ ऑक्टोबर २०२५ रोजी राघव आणि परिणीतीला मुलगा झाला असून सोशल मिडियावर राघवने ही बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली…

राघव चड्डा आणि परिणीती यांनी सोशल मिडियावर त्यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे… त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “याआधीच आयुष्य आम्हाला आठवत नाही…पहिलं आम्ही एकमेकांसाठी होतो. आता आमच्याकडे सगळं काही आहे”, असं म्हणत परिणीती आणि राघव यांनी मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे. (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : अभिनेत्री परिणीती चोप्राचा नवरा आहे तरी कोण?
================================
दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती… लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. आता या सेलिब्रिटी कपलच्या पाठोपाठ लवकरच विकी कौशल-कॅटरिना कैफ (Vicky Kaushal-Katrina Kaif), राजकुमार राव-पत्रलेखा गुडन्यूज देणार आहेत… आता या दोन्ही कपल्सना मुलगा होणार की मुलगी याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे… (Celebrity pregnancy news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi