Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Dashavatar ने रचला इतिहास; मल्याळम भाषेत रिलीज होणारा ठरला पहिला मराठी चित्रपट!
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे… १३ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आणि यात दाखवण्यात आलेली कोकणातील लोककला ‘दशावतार’ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सपाटा ४३ दिवस उलटून गेले तरी अजून सुरुच आहे… ‘कांतारा १’ सारख्या वर्ल्डवाईड सुपरहिट कन्नडा चित्रपटाला देखील टफ टक्कर देणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे… मराठी चित्रपटसृष्टीतील दशावतार हा पहिला चित्रपट ठरला आहे जो मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे… (Marathi Movie)

तरण आदर्श यांनी सोशल मिडियावर ‘दशावतार’ चित्रपटाबद्दल ही आनंदाची बातमी पोस्ट केली आहे… भारतीय आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहास पहिल्यांदाच मल्याळम भाषेत ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… सध्या मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असून प्रेक्षकांना अपेक्षित असणाऱ्या कथा पुन्हा एकदा चित्रपटांतून मांडल्या जात आहेत…(Dashavatar Release in Malayalam)
दरम्यान, ‘दशावतार’ चित्रपट खरं तर इतका सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा फार नव्हती… कथा किंवा कलाकारांवर संशय नव्हता तर त्यादरम्यान रिलीज होणाऱ्या मराठी आणि इतर भाषेतील चित्रपटांचा क्लॅश प्रेक्षक कसे हाताळणार यावर सारं काही अवलंबून होतं… मात्र, दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मराठीसह हिंदी-साऊथ चित्रपटांनाही मागे टाकत दशावतार हिट ठरला…(South Indian Movies)
================================
================================
‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3),’निशांची’, ‘थामा’ (Thamma), ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) या हिंदी आणि साऊथ चित्रपटांना टक्कर देत दशावतारने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे… सॅकनिल्कच्या डेटानुसार, ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ लाखापांसून बॉक्स ऑफिसवर कमाईला सुरुवात केली होती… दर आठवड्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळवत बॉक्स ऑफिसवर ४३ दिवसांत या चित्रपटाने २३.८५ कोटींचा टप्पा गाठला आहे… विशेष म्हणजे बॉलिवूड, साऊथच्या चित्रपटांना टक्कर देत अजूनही दशावतार चित्रपट थिएटर्समध्ये सुरु आहे… बऱ्याच महिन्यांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत दशावचार चित्रपटाने ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस थिएटर्समध्ये मुक्काम केला असून लवकरच २५ कोटींचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे… (Dashavatar box office collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi