Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

पाकिस्तानने Salman Khan याचं नाव दहशतवादी यादीत केलं समाविष्ट!
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आयुष्यात दिवसागणिक अडचणी वाढतानाच दिसत आहेत… २०-२५ वर्षांपासून काळवीट प्रकरण तर सुरुच आहे पण आता थेट त्याला पाकिस्तानने दहशतवादी घोषित करु टाकलं आहे… काही दिवसांपूर्वी सलमान खान याने बलुचिस्तानवरील केलेल्या विधानामुळे तो वादात सापडला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने सलमान खानला दहशतवादविरोधी कायदा (1997) च्या चौथ्या अनुसूची अंतर्गत दहशवतादी ठरवले आहे
सलमान खानने जॉय रियाध फोरमध्ये आपल्या भाषणात पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगवेगळा उल्लेख केला होता. यामुळे तो राजनैतिक वादात सापडला आहे. सलमान खानच्या या भाषणानंतर पाकिस्तान सरकारने त्याचे नाव त्यांच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले असून ही चौथी अनुसूची पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायदा (१९९७) अंतर्गत एक श्रेणी आहे. ही यादी दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असते. या यादीत ज्यांचे नाव समाविष्ट केले जाते त्यांना देखरेखीखाली ठेवले जाते. याबाबत विविध वृत्तांचा हवाला देत इंडिया टुडेने याबद्दल वृत्त दिले आहे… (Salman Khan Terrorist news)

अबू दाबी येथे झालेल्या फॉरममध्ये बॉलिवूडचे तीनही खान अर्थाथ शाहरुख खान, आमिर खान (Aamir Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी हजेरी लावली होती.. यावेळी, जॉय रियाध फोरमध्ये सलमान म्हणाला होता की, “सध्या, जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवला आणि तो सौदी अरेबियात प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलगू किंवा मल्याळम चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींचा व्यवसाय करतो कारण येथे इतर देशांमधून इतके लोक आले आहेत. बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत… प्रत्येकजण येथे काम करत आहे.” नेमकं त्याचं हेच विधान त्याला भोवलं आहे… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन
================================
एकीकडे वर्षानुवर्ष सलमान खानचं काळवीट प्रकरण (Blackbug case and Salman Khan) सुरुच असताना आता पाकिस्तानने थेट दहशतवादी घोषित केल्यामुळे सलमान खानच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. आता यावर सलमान खान काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi